शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांची संख्या वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. सर्वाधिक धानही आधारभूत केंद्रावर विकला जातो. परंतु धान खरेदी केंद्रांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोेरे जावे लागते. बरेचदा शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. आठ-आठ दिवस धान विक्रीची प्रतीक्षा करावी लागते. अवकाळी पावसाचा उघड्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या धानाला फटका बसतो.

ठळक मुद्देदिलासा : मुंबई येथील बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आधारभूत धान खरेदी केंद्राची संख्या अपुरी असल्याने दरवर्षी धान विकताना शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. आठ ते दहा दिवस धान खरेदी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान उघड्यावर असतात. ही अडचण लक्षात घेऊन आणि शेतकऱ्यांची कोंडी होऊ नये म्हणून जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत झालेल्या मुंबई येथील बैठकीत घेण्यात आला. यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. सर्वाधिक धानही आधारभूत केंद्रावर विकला जातो. परंतु धान खरेदी केंद्रांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोेरे जावे लागते. बरेचदा शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. आठ-आठ दिवस धान विक्रीची प्रतीक्षा करावी लागते. अवकाळी पावसाचा उघड्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या धानाला फटका बसतो. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने मुंबई येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची बुधवारी बैठक  अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी खासदार पटेल यांनी धान खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी. दीड ते दोन हजार हेक्टर क्षेत्रामागे एक केंद्र देण्यात यावे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितींना सुद्धा हमी भाव धान खरेदी केंद्राची परवानगी देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी ना.भुजबळ यांनी खरेदी विषयी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तसेच मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विभाग मंडळांना सर्व बाबींचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नवीन धान खरेदी केंद्र सुरु करुन धान खरेदी वाढविण्यात यावी, धान उत्पादन जास्त होणार असल्याने त्यानुसार बारदाना उपलब्धतेचे नियोजन करावे या अनुषंगाने सार्वजनिक वितरण प्रणालीचे योग्य व्यवस्थापन करावे अशी सूचनाही करण्यात आली.बैठकीला खासदार प्रफुल पटेल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री अनिल देशमुख, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्ता तणपुरे, आमदार राजु कारेमोरे, मोहन चंद्रिकापुरे यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव आणि मार्केटिंग फेडरेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना वेळेत चुकारे मिळावे-प्रफुल पटेलशासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही. केंद्रावर बारदाना व इतर सोयी-सुविधा मिळाव्यात तसेच धानाची विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना धानाचे चुकारे वेळेत मिळावे या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना खासदार प्रफुल पटेल यांनी या बैठकीत केली. 

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल