शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

एनआरसी, सीएए विरोधात जिल्ह्यात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 06:00 IST

भंडारा शहरात येथील गांधी चौकातून वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकडो नागरीक सहभागी झाले होते. हातात फलक घेवून एनआरसी रद्द करा, अशा घोषणा देत होते. हा मोर्चा जिल्हा कचेरीसमोरील त्रिमुर्ती चौकात पोहचला. त्यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. शहरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. मात्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीवर धडक : वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाअंतर्गत भंडारा येथे जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. यासोबतच जवाहरनगर, लाखनी, मोहाडी येथेही आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात आंदोलन शांततेत पार पडले असून कुठेही अनुचित घटना घडली नाही. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.भंडारा शहरात येथील गांधी चौकातून वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकडो नागरीक सहभागी झाले होते. हातात फलक घेवून एनआरसी रद्द करा, अशा घोषणा देत होते. हा मोर्चा जिल्हा कचेरीसमोरील त्रिमुर्ती चौकात पोहचला. त्यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. शहरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. मात्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे, युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत सुर्यवंशी, महासचिव दीपक गजभिये, सुरेश खंगार, प्रशांत, महावीर घोडेस्वार, संघपाल तिरपुडे, शैलेश राऊत, आर.ए. चिमनकर, राहुल गजभिये, गनलाल मेश्राम, मुक्ती महबूब रजा मौलाना, मुक्ती साजीद मौलाना यांच्यासह मर्कजी सिरतुल्लबी कमिटीचे पदाधिकारी व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. तसेच रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून सीएए व एनआरसी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देताना अचल मेश्राम, अरुण गोंडाने, राहूल गजभिये, भीमराव टेंभूर्णे, अंकुश सुखदेवे, मुलचंद मेश्राम, बुद्धपाल डहाके, क्रिष्णा देशभ्रतार, सेवक तिरपुडे, भजनदास मेश्राम, सतीष मेश्राम, राहूल बडोले, महेंद्र देशपांडे, प्रदीप मेश्राम, राजू नंदेश्वर, सौरभ चवरे उपस्थित होते.

टॅग्स :National Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी