शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

न.प. च्या रोजंदारी कर्मचाºयांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:27 IST

स्थायी होण्याच्या आशेने मागील २०-२५ वर्षांपासून नगर परिषदेत कार्यरत सुमारे १८७ रोजंदारी कर्मचाºयांचे नशीब फळफळले असून त्यांच्या कष्टाचे फलीत मिळणार आहे.

ठळक मुद्दे१५ दिवसांत स्थायी करण्याची कारवाई : विशेष बैठकीत आमदार अग्रवाल यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्थायी होण्याच्या आशेने मागील २०-२५ वर्षांपासून नगर परिषदेत कार्यरत सुमारे १८७ रोजंदारी कर्मचाºयांचे नशीब फळफळले असून त्यांच्या कष्टाचे फलीत मिळणार आहे. शैक्षणिक अर्हतेच्या आधारावर सुमारे ६५ कर्मचाºयांना स्थायी करण्याची प्रक्रीया येत्या १५ दिवसांत सुरू होणार असून उर्वरीतांना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आस्थापना खर्चाच्या आधारावर स्थायी केले जाणार आहे.नगर परिषदेतील रोजंदारी कर्मचाºयांना स्थायी करण्याच्या मागणीसाठी युनीयनचे अध्यक्ष जहीर अहमद मागील कित्येक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. सन २००६ पासून आमदार गोपालदास अग्रवाल यांनी अहमद यांच्या मागणीला घेऊन राज्य शासनाच्या स्तरावर आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत. रोजंदारी कर्मचाºयांच्या या मागणीला घेऊन शेवटी ७ तारखेला मुंबई मंत्रालयात नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी विशेष सभा बोलाविली होती.आमदार अग्रवाल, न.प.प्रशासन संचालक विरेंद्र सिंह, मुख्याधिकारी चंदन पाटील, कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अहमद यांच्यासह संबंधीत अधिकाºयांच्या उपस्थितीत रोजंदारी कर्मचाºयांचा विषय आमदार अग्रवाल यांनी मांडला.यावर जे रोजंदारी कर्मचारी १० व १२ वी उत्तीर्ण आहेत अशा सुमारे ६५ कर्मचाºयांना प्रथम टप्प्यात १५ दिवसांच्या आत स्थायी करण्याची कारवाई सुरू केली जाईल. तर उरलेल्या सुमारे १२२ कर्मचाºयांना आस्थापना खर्चाच्या आधारावर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून स्थायी करण्याची कारवाई करण्याचा निर्णय आमदार अग्रवाल यांच्या मागणीवरून घेण्यात आला. विशेष म्हणजे, आमदार अग्रवाल यांनी नगर परिषदेतील अधिकाºयांच्या अभावामुळे कारभार अव्यवस्थीत झाल्याचा मुद्दा बैठकीत मांडत संवर्गातील ४० पैकी ३३ पदे रिक्त असून त्यांना भरणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगीतले. गोंदिया शहराला ‘अमृत’ योजनेत समाविष्ट करण्यात आल्याने योजनेच्या क्रियान्वयनासाठी रिक्त पदे भरावी यासाठीही ते प्रयत्नरत असल्याचे सांगीतले.विशेष म्हणजे, कित्येक वर्षांपासून आपली सेवा देत रोजंदारी कर्मचारी फक्त स्थायी होण्याची आशा बाळगून आहेत. त्यांच्या आशेची पूर्तता व्हावी यासाठी रोजंदारी कर्मचारी युनियनच्या माध्यमातून त्यांचा लढा मागील २०-२५ वर्षापासून सुरू आहे. मात्र त्यांच्या या मागणीकडे कुणीही लक्ष घातले नाही.