शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

न.प. मोफत इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणजे पर्वणीच

By admin | Updated: July 10, 2017 00:17 IST

आधुनिक युगात तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता इंग्रजी भाषेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

चरण वाघमारे यांचे प्रतिपादन : न.प. इंग्रजी वर्गाचे प्रवेशोत्सवलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आधुनिक युगात तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता इंग्रजी भाषेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. परंतु इंग्रजी शिक्षण महागडे झाल्याने सर्वसामान्यांचे पाल्य वंचित राहत होते. अशांना समाज प्रवाहात आणण्यासाठी नगरपरिषद तुमसरने मोफत इंग्रजी माध्यमांची शाळा सुरु करून तुमसरकरांकरिता पर्वणीच उपलब्ध करून दिल्याचे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी व्यक्त केले.येथील न.प. माधवराव पटेल प्रायमरी शाळा येथे आयोजित केजी १, केजी २ वर्गाचे शुभारंभ व प्रवोशोत्सव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपाध्यक्ष कांचन कोडवानी, तारिक कुरैशी, जिल्हाध्यक्ष भाजपा, नगरसेवक रजनिश लांजेवार, मेहताबसिंग ठाकुर, किशोर भवसागर, पंकज बालपांडे, प्रमोद घरडे, शिक्षण सभापती सचिन बोपचे, अर्चना भुरे, गीता कोंडेवार, छाया मलेवार, किरणदेवी जोशी मुख्याध्यापक थोटे मंचावर उपस्थित होते.यावेळी वाघमारे यांनी, जिल्हा परिषद व नगर पालिकेमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांची तुलनात्मक परीक्षण करून सांगितले की जि.प. व न.प. मध्ये शिक्षकांची निवड ही सरळ सेवा भरतीने होते. त्यामुळे निश्चितच तेथील शिक्षक हा बुद्धीवान आहे. शैक्षणिक कार्य शिक्षकांकडून करून नो वर्क नो पेमेंटच्या धर्तीवर कार्य करण्याचा सल्ला दिला. तर अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी, न.प. शाळेचा ढासळलेला दर्जा नव्याने उदयास आणण्याकरिता न.प. नेहरु शाळेचे प्राचार्य व शिक्षकांचे अभिनंदन करून हा दर्जा असाच उंचाविण्याकरिता न.प. ची संपूर्ण साथ द्यावी असे सांगितले. यावर्षी न.प. चार शाळेत इंग्रजी माध्यमांचे वर्ग सुरु केले. त्यास जनतेचा भरघोस प्रतिसाद दिला. अन्य शाळेतही दुसऱ्या सत्रात वर्ग सुरु करणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक शिक्षण विभागाचे सभापती सचिन बोपचे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश ब्राम्हणकर यांनी तर उपस्थितांचे आभार भास्कर उपरीकर यांनी मानले. यशस्वितेकरिता प्रशासक अधिकारी नितीन वाघमारे, शिक्षक कावळे, रायकवार, ढोके, वंजारी, जयतवार, मोहन बोरघरे यांनी सहकार्य केले.