शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आता मागेल त्याला पोल्ट्री व गोटफार्म देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 23:57 IST

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्याचा नॅशनल डेरी डेव्हलपमेंट बोर्डमध्ये समावेश नव्हता.

ठळक मुद्देमहादेव जानकर : मानेगाव येथे पशुपक्षी प्रदर्शनी व शेतकरी मेळावा

आॅनलाईन लोकमतभंडारा : पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्याचा नॅशनल डेरी डेव्हलपमेंट बोर्डमध्ये समावेश नव्हता. आता या जिल्ह्याचा समावेश करण्यात आल्यामुळे दुधाच्या उत्पादनात वाढ होईल. महाराष्ट्रात आंध्रप्रदेशातून अंडी मागविण्यात येत होती. परंतु पुढील वर्षात राज्यातच अंडी उपलब्ध करून देण्यात येतील. मागेल त्याला शेततळे या योजनेप्रमाणे आता मागेल त्याला पोल्ट्रीफार्म व मागेल त्याला गोटफार्म योजना राबविणार आहे, असे प्रतिपादन पशु संवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व भंडारा पंचायत समितीच्या विद्यमाने मानेगाव येथे पशुपक्षी प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आ.डॉ.परिणय फुके, आ.रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, कृषी सभापती नरेश डहारे, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, सभापती प्रल्हाद भुरे, पशुसंवर्धन उपायुक्त सुरेश कुंभरे, पशुसंवर्धन अधिकारी नितीन फुके, मानेगावचे सरपंच प्रभाकर बोदेले उपस्थित होते.यावेळी ना.जानकर म्हणाले, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायाच्या सर्व योजना आता आॅनलाईन करण्यात येणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात वाढीव मागणी सादर करणार आहे. शेतीसोबतपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व मत्स्यशेतीकडे लक्ष देऊन शेतकºयांचा आर्थिकस्तर उंचावण्यावर भर देण्याचा शासनाचा निर्धार आहे. पशुपालकांना योजनांचा लाभ देण्यासाठी व शेतकºयांचे उत्पन्न वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल. या विभागात तलाव तेथे मासोळी अभियान राबवून मत्स्य व दुग्ध व्यवसायास चालना दिल्याबद्दल विभागीय आयुक्त अनुपकुमार व जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे अभिनंदन केले.यावेळी आ.परिणय फुके म्हणाले, पशुपक्षी प्रदर्शनी व शेतकरी मेळावे गावागावात घेण्याची गरज आहे. धानासोबत पुरक व्यवसाय म्हणून मत्स्यशेती व दुग्ध व्यवसाय करावा. आपल्या जिल्ह्यात सव्वातीन लाख दुधाचे उत्पादन होते ते साडेचार लाखावर कसे नेता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात दुग्ध उत्पादनाचा मोठा प्रकल्प उभारावा, अशी मागणी त्यांनी ना.जानकार यांना केली. यावेळी आ.अवसरे, सभापती नरेश डहारे यांनी मार्गदर्शन केले.प्रस्ताविकात नितीन फुके यांनी मेळाव्याची माहिती सांगितली. यावेळी पशुपालक व कुक्कुटपालक शेतकºयांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या पशुपक्षी प्रदर्शनीत पशुंच्या वेगवेगळया जातीचा समावेश होता. या मेळाव्याला विविध विभागाचे अधिकारी, शेतकरी, गावकरी व विद्यार्थी उपस्थित होते.