शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

-आता समाधानकारक पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 15, 2015 00:34 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी, उन्हाळवाही, काडी-कचरा वेचणी आदी मशागतीची कामे पूर्ण केली आहे.

बियाण्यांची जुळवाजुळव : संकट पाठ सोडायला तयारच नाहीभंडारा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी, उन्हाळवाही, काडी-कचरा वेचणी आदी मशागतीची कामे पूर्ण केली आहे. शेतामध्ये शेणखते पसरविण्याचेही काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे धरणी हिरवा शालू नेसण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र दिसून येते. बळीराजा आता बियाण्यांची कशीबशी जुळवाजुळव करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र दमदार पाऊस न कोसळल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे.मागील वर्षीचा दुबार, तिबार पेरणीचा अनुभव बघता बळीराजा यावर्षी पेरणीकरिता सध्या कोणतीही ‘रिस्क’ न घेण्याच्या भूमिकेत दिसत आहे. आपल्याकडील शेती निसर्गाच्या पावसावर अवलंबून असून निसर्गाचा पाऊस लहरी आहे, हे चित्र पुन्हा सध्या तरी दिसत आहे. मात्र या लहरी पावसावरच शेतकऱ्यांचे संपूर्ण भविष्य अवलंबून आहे. मागील वर्षीचा अनुभव बघता बळीराजा यावर्षी कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायला तयार नसल्याचे चित्र आहे. दुबार, तिबार पेरणीचे संकट येऊ नये म्हणून शेतकरी सतर्क आहे. समाधानकारक पावसाची आता शेतकरी वाट बघत आहे. मागील काही महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावून घरावरील छते व टिनपत्रे उडविली. वीज पुरवठाही खंडित झाला होता. अशा अनेक संकटांना तालुक्यातील शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. एप्रिल व मे महिन्यात बळीराजाने लगीनसराईची कामे उरकवून घेतली. मात्र अद्यापही मान्सूनचा पाऊस आलाच नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून बियाणे, रासायनिक खते खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. यंदाही जादा दराने बियाणे व खताची विक्री, मुदतबाह्य बियाणांची विक्री होत असल्याचे चित्र आहे. दुबार, तिबार पेरणीचा फटका बसू नये म्हणून पेरणीकरिता बळीराजा विचारपूर्वक पाऊल टाकत आहे. शेती दिवसेंदिवस बेभरवशाची झाली असून मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च आणि कुटुंबाचा भार पेलतानाच खरीप हंगामाच्या बियाण्यांची जुळवाजुळव करताना उसणवारी करून कर्ज काढल्याशिवाय शेतकऱ्याकडे दुसरा पर्याय दिसत नाही. मात्र नापिकी आणि कर्जाने शेतकरी होरपळला असताना पुढील शेतीच्या हंगामाकरिता पैसा आणायचा कुठून, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. गेल्या हंगामात निसर्गाने दगा दिला. तरी पुन्हा नव्या जोमाने हिरवे स्वप्न उराशी बाळगून बळीराजा जोमाने शेती कामाकडे वळत आहे. (प्रतिनिधी) आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक संकट बळीराजाची पाठ सोडायला तयार नाही. मात्र निसर्ग साथ देईल आणि शेती पिकवून कर्जाचा डोंगर कमी होईल, या आशेच्या बळावर रखरखत्या उन्हात बळीराजा शेतीची मशागत करीत आहे. बियाण्यांची जुळवाजुळव आणि शेतीची मशागत अंतिम टप्प्यात आली आहे. शेती हा एकच पर्याय शेतकऱ्यांसमोर असल्याने शेतीसाठी पैसा जुळवताना शेतक-यांच्या नाकीनऊ येत आहे.