शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

आता वणव्यावर ‘सॅटेलाईट’ची नजर

By admin | Updated: April 10, 2015 00:40 IST

फेब्रुवारी, मार्चपासून जंगलात वणव्यांचा हंगाम सुरु होतो. मात्र आता वणव्यांवर ‘सॅटेलाईट’ची नजर राहणार आहे.

भंडारा : फेब्रुवारी, मार्चपासून जंगलात वणव्यांचा हंगाम सुरु होतो. मात्र आता वणव्यांवर ‘सॅटेलाईट’ची नजर राहणार आहे. यंदा उन्हाळ्यात पाऊस बरसल्याने आगीच्या घटनांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. ही बाब वन्यप्राण्यांना दिलासा देणारी आहे. उन्हाळा सुरु झाला की, व्याघ्र प्रकल्पांत वन्यप्राण्यांना पाण्याचा तुटवडा जाणवतो. काही भागात वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी जंगलाला आगी लावण्याचे प्रकार घडतात. हा प्रकार रोखण्यासाठी डेहराडून येथील संस्थेकडून राज्यातील वणव्यांवर सॅटेलाईटने पाळत ठेवली जात आहे. वणव्याची स्थिती लक्षात घेता व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्याघ्र प्रकल्पात आगी लावून वन्यप्राण्यांची शिकार करणे हा शिकाऱ्यांचा उद्देश असतो. या प्रकाराला आळा घालण्याकरिता आग लागल्याची माहिती देणाऱ्या व्यक्तीला प्रमाणपत्र, बक्षीस देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. एखाद्या वनक्षेत्रात आग लागल्यास ही माहिती डेहराडून येथील संस्थेला उपग्रहाच्या माध्यमातून पाठविली जाते. त्यानंतर कोणत्या वनक्षेत्रात आग लागली, हे लगेच वनअधिकाऱ्यांना कळविले जाते. राज्यात कोणत्या वनक्षेत्रात आग लागली ही माहिती क्षणात सर्वदूर पसरत असल्याने वेळीच या आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. या नव्या ‘सॅटेलाईट’ उपक्रमाचा धसका वनकर्मचारी, अधिकाऱ्यांनी घेतला असून यामुळे आगीच्या घटना रोखण्यात यश मिळणार आहे. उन्हाळा सुरु होऊन दोन महिने झाले असताना विदर्भात कोठेही वणवा पसरल्याची घटना निदर्शनास आलेली नाही. यापूर्वी उन्हाळा सुरू झाला की, शिकारी जंगलाला आगी लावून वन्यप्राण्यांची हत्या घडवून आणायचे. मात्र, ‘सॅटेलाईट’ या प्रणालीने व्याघ्र प्रकल्पात आगी लागण्याच्या घटना नगण्य झाल्या आहेत. प्रत्येक वनवृत्तात १० ते १२ मीटर अंतरावर जाळरेषा तयार करण्यात आली आहे. फायर टॉवर उभारण्यात आले आहे.बिनतारी संदेश यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. जंगलालगत असलेल्या गावांतील नागरिकांना खबरे म्हणून भूमिका बजावण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. त्याकरिता त्यांना विशेष मानधनदेखील दिले जात आहे. नागझिरा व्याघ्र प्रकल्पात ५ ते १० कि.मी.पर्यंत जाळरेषा तयार करुन आगीवर नियंत्रण मिळविले गेले आहे. मेळघाट, ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्पासह बोर अभयारण्यातही वणव्यावर कटाक्ष ठेवला जात आहे. (नगर प्रतिनिधी)