शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आता हरित महाराष्ट्र अभियान

By admin | Updated: July 5, 2015 00:38 IST

पावसाळ्याची चाहूल लागली की वृक्षारोपनास प्रारंभ होतो. त्याला अधिक गती देण्यासाठी दरवर्षी सामाजिक वनीकरण

वृक्षारोपणास प्रोत्साहन : विविध जातीचे रोपे होणार उपलब्धभंडारा : पावसाळ्याची चाहूल लागली की वृक्षारोपनास प्रारंभ होतो. त्याला अधिक गती देण्यासाठी दरवर्षी सामाजिक वनीकरण विभागामार्फत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. साधारणपणे आॅगस्ट महिन्यात होणारा वन महोत्सव यंदा १ते १५ जुलै दरम्यान होणार असून त्याचे नामकरण 'हरित महाराष्ट्र अभियान' असे करण्यात आले आहे. या अभियानातून संपूर्ण पंधरवड्यात वृक्षारोपणासाठी प्रोत्साहन देण्यासोबतच विविध प्रजातीचे रोप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.सर्वत्र पावसाने हजेरी लावली असून वृक्षलागवडीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये वृक्ष लागवडी बाबत जागृती निर्माण होण्याकरिता व समाजात पर्यावरण विषय जनजागृतीसाठी सामाजिक वनीकरण विभागाअंतर्गत १ते १५ जुलै दरम्यान हरित महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. याकरिता लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध विभागाचे शासकीय अधिकारी, शेतकरी, स्वयंसेवी संस्था, वनश्री पुरस्कार विजेते, महानगर पालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालय आदीचा सहभाग घेण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)फिरते रोप विक्री हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत १ते १५ जुलै दरम्यान विविध प्रजाती सवलतीचे झाडे स्वस्त दरात विक्री, वितरण करण्याकरिता शहर, गावाच्या अनेक भागात वाहणाद्वारे फिरते विक्री करण्याचे सूचवण्यात आले आहे. तसेच रोप विकत घेणाऱ्यांना पुढील वर्षी कुठल्या वृक्ष प्रजाती किती संख्येत लागतील, याची मागणीही नोंदवण्यात येणार आहे. नागरिकांचा अभिप्रायही नोंदविला जाणार आहे.स्थानिक समस्यांचा सहभागजिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत महापालिका, नगरपरिषद व त्यांच्या उपक्रमांतर्गत रस्ते, गावठाण, गावातील मोकळ्या जागा, गावातील शाळेचा परिसर, बाजापेठ, प्राथर्नास्थळे, स्मशानभूमी आदी परिसरात वृक्ष लागवड घेण्यासाठी उत्साहीत करण्यात येईल. तसेच वृक्षारोपणास इच्छुक शाळा, संस्थांना रोप उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सवलतीच्या दरात रोपेअभियानाअंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध प्रजाती सवलतीच्या दरात विक्री करण्यासाठी शहरात, गावात वेगवेगळ्या दिवशी चार ते पाच ठिकाणी स्टॉल लावण्यात येणार आहेत. स्टॉल शक्यतो बाजारपेठेत किंवा बाजाराच्या दिवशी उभारण्यात येतील. या स्टॉलवर सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, कमर्चारी इको क्लबचे विद्यार्थी यांच्या मदतीने माहिती देण्यात येणार आहे.विविध माध्यमातून प्रसिद्धी वृक्षारोपण, वृक्ष प्रजाती, गट लागवड, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड, विविध योजना, परसबाग, वनौषधी आदींची माहिती देणारी फलके, घडीपत्रिका उपलब्ध करण्यात येणार आहेत.