शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

आता सिंचन विहिरींना मिळणार तीन लाख रुपयांचे अनुदान

By admin | Updated: November 22, 2015 00:23 IST

जवाहर विहीर योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळाला होता. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी

योजनेचे स्वरुप बदलले : जवाहर विहिरींचा अनुशेष भरुन निघणारचंदन मोटघरे लाखनी जवाहर विहीर योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळाला होता. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुशल कामांतर्गत विहिरी तयार करण्यात आल्या होत्या. जवाहर योजना बंद पडली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विहिरींना शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे राज्य शासनाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन सिंचन विहिरीचा उपक्रम राबवित असुन प्रत्येक तालुक्याला नवीन विहीरीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी विहिरीसाठी अर्ज सादर केले होते त्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहिरीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गट विकास अधिकाऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली. यात सन २०१२-१३, २०१३-१४ मध्ये मंजूर विहिरी एमआयएस नोंद असलेल्या २,८४५ विहिरीपैकी ३१५ रद्द करण्यात आले आहेत. शिल्लक २,५३० विहिरीपैकी २,२४६ सीसी अपलोड, २४१ बोअरकरिता ४३ सीसीकरीता प्रलंबित ठेवण्यात आले होते. त्यावर पंचायत समितीच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. नवीन प्रस्ताव ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.भंडारा जिल्ह्यात जवाहर विहिरीच्या अनुशेष १,०५६ विहिरीचा आहे. नवीन ७०० विहिरींना मंजुरी दिलेली आहे. अश्या २०१५-१६ मध्ेय १,७५६ सिंचन विहीरींचे बांधकाम मग्रारोहयो माध्यमातून करावयाचे आहेत. जवाहर रोजगार योजनेच्या विहिरीचा अनुशेष तालुकानिहाय याप्रमाणे, भंडारा २४२, लाखांदूर २२, लाखनी ९४, मोहाडी १९४, पवनी १४५, साकोली १३१, तुमसर २२८ याप्रमाणे आहे. नवीन विहीरी तालुका निहाय भंडारा ५०, लाखांदूर २००, लाखनी ११५, मो हाडी ३५, पवनी १००, साकोली २००, तुमसर १०० याप्रमाणे मंजुर करण्यात आलेले आहे. लाखनी तालुक्याला २०९ विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आमदारांच्या शिफारशीने जवाहर विहिरीचे वाटप होत असे त्यालाच नवीनतम स्वरुप देण्यात आले आहे. जवाहर विहिरींचे अनुशेष पुर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत. त्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना विहिर नको, अशा शेतकऱ्यांचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहे.सिंचन विहिरीचे अनुदान शासनाने पाठवले आहे. ३ लाख रूपयांपर्यंतचे अनुदान नवीन सिंचन विहिरीसाठी दिले जाणार आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून अडगळीत गेलेली विहिर योजना पुन्हा नव्या स्वरुपात शेतकऱ्यांसमोर आली आहे. सिंचन विहिरीकरिता लाभार्थी निवड ग्रामसभाद्वारे करावयाचे आहे. त्यात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय तसेच दारिद्रय रेषेखालील असलेल्या कुटूंबाना प्राधान्य देण्यात येणार आहे. नोव्हेंबर २०१५ पर्यंत लाभार्थि निश्चित करुन डिसेंबर पासून सिंचन विहिरीचे कामे प्राधान्याने सुरु कराव्यात अशा सुचना आहेत. शासन विहिरीसाठी अनुदान देत असते. विहिरी खोदल्या जातात. पण पाणी लागत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा कल विधन विहिरीकडे आहे. शासनाने अनुदानात वाढ करुन योजना पुर्नजिवित केली आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळतो यावरच या योजनेचे यशापयश अवलंबून आहे.