शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आता गडचिरोली शहर होणार डुक्करमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:20 IST

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट डुकरांचा हैदोस प्रचंड वाढल्याने शहरवासियांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच यासंदर्भात नागरिकांकडून पालिकेला तक्रारी प्राप्त झाल्या.

ठळक मुद्दे मोहीम : वाशिमचे १० जणांचे पथक दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट डुकरांचा हैदोस प्रचंड वाढल्याने शहरवासियांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच यासंदर्भात नागरिकांकडून पालिकेला तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारीची दखल नगर पालिका प्रशासनाने घेतली असून आता शुक्रवारपासून मोकाट डुक्कर पकडण्याची धडक मोहीम शहरात राबविण्यात येणार आहे. यासाठी वाशिम येथून १० जणांचे पथक गडचिरोली शहरात दाखल झाले असून लवकरच गडचिरोली शहर १०० टक्के डुक्करमुक्त होणार आहे, अशी माहिती पालिकेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुनघाडकर यांनी लोकमतशी बोलताना गुरूवारी दिली.गडचिरोली शहराच्या बहुतांश वॉर्डात मोकाट डुकरांचा उपद््याप प्रचंड वाढला आहे. मोकाट डुकरे मुख्य मार्गानेही फिरत असल्याने अनेकदा वाहनांचे अपघात घडले आहेत. रात्रीअपरात्री डुकरे नागरिकांच्या घराशेजारी, गल्लीबोळात फिरून घाण पसरवित असतात. या तक्रारीची दखल घेऊन नगर पालिका प्रशासनाने सुरुवातील डुक्कर मालकांना नोटीस देऊन डुकरांचा बंदोबस्त करण्याचा इशारा दिला होता. ५ सप्टेंबर व ६ आॅक्टोबर रोजी डुकरांच्या मालकांना नोटीस बजाविण्यात आली होती. तसेच ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहनही करण्यात आले होते. त्यानंतर वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून डुक्कर पकडण्यासाठी पथकाची गरज असल्याचे पालिकेने आवाहन केले होते. आता वाशिम येथील पथक डुकरांच्या बंदोबस्तासाठी गडचिरोलीत दाखल झाले असून शुक्रवारीपासून मोहीम सुरू होणार आहे.