शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आता पशुवैद्यकीय दवाखान्यात चारा बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:11 IST

पशुपालकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय म्हणजे जनावरांच्या आहारात हिरवा चारा. पशु आहारात चांगल्या प्रतिची हिरवी वैरण दिल्यास दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते....

ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : जनावरांच्या आहारात महत्त्व, ठोंबे मिळणार मोफत

आॅनलाईन लोकमतभंडारा : पशुपालकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय म्हणजे जनावरांच्या आहारात हिरवा चारा. पशु आहारात चांगल्या प्रतिची हिरवी वैरण दिल्यास दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते ही बाब शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगण्यासाठी पशुवैद्यकीय विभाग जिल्हा परिषदच्या वतीने वैनगंगा कृषी महोत्सवात हिरव्या वैरणीचे महत्व पटवून देणारा स्टॉल शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.जनावरांना सकस हिरवा आहार मिळावा व त्या माध्यमातून दूध उत्पादन वाढावे यासाठी जिल्ह्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यात चारा बाग लावण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन फुके यांनी दिली. लेंडेझरी या ठिकाणी दीड एकरावर सर्व जातीची चारा बाग लावण्यात आली आहे.जिल्ह्यातील १६ पशुवैद्यकीय दवाखान्यात २६ जातीच्या वैरणीची लागवड करण्यात येणार आहे. ज्याद्वारे शेतकºयांना आपल्या पशुधनासाठी हिरवा चारा उपलब्ध होणार आहे.या रुचकर चाऱ्यामध्ये भरपूर उत्पादन मिळवून देण्याची क्षमता असते. हायब्रीड नेपियर गवत, गिनी गवत, अंजन गवत, पांढरी मुसळी, दशरथ गवत, शेवरी, स्टायलो, छाया, लसूण गवत व दिनानाथ गवत असे हिरव्या वैरणीचे प्रकार आहेत.हा चारा जनावरांना नियमित दिल्यास दूध उत्पादन नक्कीच वाढते.हिरव्या वैरणासाठी जिल्ह्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यात चारा बाग लावण्यात येणार आहे. या बागेतून शेतकºयांना वैरणीचे ठोंबे मोफत मिळणार आहेत. ज्या द्वारे शेतकरी आपल्या शेतात हिरवा उत्पादन करू शकतील. ज्याचा उपयोग करून दूध उत्पादनात वाढ करता येईल.हिरव्या चाºयामुळे उत्पादनात दहा ते वीस टक्के निश्चित वाढ होते. ही सर्व प्रक्रिया या प्रदर्शनात शास्त्रीय पध्दतीने उपस्थितांना समजावून सांगितली‘हायड्रोपोनिक्स’ हिरवा चारामातीचा वापर न करता कमी पाण्यावर हायड्रोपोनिक्स हिरवा तयार करण्याची पद्धत खूप चांगली आहे. ज्यांच्या कडे जमीन नाही ते शेतकरी सुद्धा घरी हा चारा तयार करू शकतात. एक किलो मक्यामध्ये ९ ते १२ किलो हायड्रोपोनिक्स चारा तयार होतो. हा चाºयामुळे दूध उत्पादनात मोठी वाढ होते.