शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे शाळांमध्ये पर्यावरण रक्षक सेना

By admin | Updated: July 12, 2015 00:43 IST

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय हरितसेना शाळांच्या धर्तीवर प्रत्येक शाळेत मुख्याध्यापकांनी किमान १० विद्यार्थी व विद्यार्थिनीचा गट...

भंडारा : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय हरितसेना शाळांच्या धर्तीवर प्रत्येक शाळेत मुख्याध्यापकांनी किमान १० विद्यार्थी व विद्यार्थिनीचा गट ‘पर्यावरण रक्षक सेना’ म्हणून तयार करून त्याचा गटप्रमुख नेमण्याबाबत शासनाकडून शाळांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. हा उपक्रम सामाजिक वनीकरण विभागामार्फत राबविला जाणार असून स्वातंत्र्य दिनी शाळा, महाविद्यालय व विद्यापीठ परिसरात किमान २० वृक्ष लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांच्यावतीने सन २०१५-१६ मधील पावसाळ्यापासून जिल्हा परिषद, नगरपरिषद व महानगरपालिका अंतर्गत शासकीय शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठाच्या आवारात २० रोपे लावून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करावयाचे आहे. या कार्यक्रमानुसार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये १५ आॅगस्ट रोजी झेंडावंदनानंतर घेण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेने सदर झाडे लावल्यानंतर त्यातील किमान ८० टक्के रोपे जिवंत ठेवण्याची व त्याचे रक्षण करून पाणीपुरवठा व कायमस्वरूपी देखभाल व संगोपणाची व्यवस्था शाळेने करावयाची आहे. केंद्र सरकारच्या हरितसेनेच्या धर्तीवर प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी दहा विद्यार्थी, विद्यार्थिनींचा गट पर्यावरण रक्षकसेना म्हणून तयार करून त्याच्या गटप्रमुखावर ही जबाबदारी द्यावयाची आहे. या कार्यक्रमात ज्या शाळांची कामगिरी उत्तम असले त्यांना प्रोत्साहन म्हणून योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर तिसऱ्या वर्षांपासून मूल्यांकन करून तालुका, जिल्हा, विभागस्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस योजना, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)