शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आता वनकर्मचाऱ्यांना पोलिसांप्रमाणे भत्ते

By admin | Updated: July 27, 2016 00:36 IST

जीव धोक्यात घालून जंगलात अहोरात्र गस्त घालणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना सोयीसुविधांपासून वंचित रहावे लागत आहे.

वनमंंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन : गणवेश, प्रवास व आहार भत्त्याचा समावेशभंडारा : जीव धोक्यात घालून जंगलात अहोरात्र गस्त घालणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना सोयीसुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवाार यांनी वन कर्मचाऱ्यांना पोलिसांप्रमाणे गणवेश, प्रवास व आहार भत्ता देण्याचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेच्या शिष्टमंडळाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबई येथील दालनात भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मुनगंटीवार यांनी, वन कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यात वनरक्षक, वनपाल यांचे अन्यायकारक वेतनश्रेणीत सुधार करण्याची मागणी होती. यावर मुनगंटीवार यांनी, १५ दिवसांचे आंत निर्णय घेवून वेतनश्रेणी वाढवून देण्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. वन कर्मचाऱ्यांना पोलिसांप्रमाणे गणवेश भत्ता ५ हजार १६७ रूपये, आहार भत्ता व कायम प्रवास भत्ता देण्याचे मान्य करण्यात आले.वनरक्षक व वनपाल यांच्या आंतरवृत्तीय बदल्या विशेष परिस्थितीत करण्याचे मान्य केले. संपकालीन ११ दिवसांचे कपात केलेला पगार देण्याचे यावेळी मंत्र्यांनी मान्य केले. वनपालांची सरळसेवा भरती न करण्याचे मान्य करण्यात आले. यासोबतच वनरक्षक, वनपाल यांचेवर होणाऱ्या वनसंरक्षणातील हल्ल्या हा गंभीर विषय असून त्याला गंभीरतेने घेण्याचे व उपाय करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले.शिष्टमंडळात विजय मेहर, चंद्रकांत कांबळे, सुनिल बोंडीवले, प्रविण डोंगरखेडकर, गाजी शेख, ए. के. निमगडे, आर. एच. पवार, सुनिल फुलझेले, एस. एस. तळपाळे, एच. जी. घुगे, डी. टी. कोहाड आदींचीे उपस्थिती होती. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनकर्मचाऱ्यांच्या व्यथा ऐकून त्यांना समाधानकारक उत्तर व आश्वासन दिले. वनमंत्र्यांच्या आश्वासनानंतर वनकर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)वेतन मिळणार पहिल्या तारखेलावनरक्षक व वनपाल यांचे वेतन १० तारखेपर्यंत करण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली होती. यावेळी मुनगंटीवार यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेलाच देण्यात यावे असे आदेश दिले. यात हयगय कारणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी लागलीच दिले. सेवाजेष्ठता यादी दरवर्षी प्रकाशित करून त्यानुसार पदोन्नती करण्यात येईल. प्रत्येक वनविभागात गस्ती पथक तयार करून ६० हजार रूपये किंमतीपर्यंतची मोटरसायकल देण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.