शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आता नववी नापासांना दहावीत प्रवेश

By admin | Updated: July 18, 2015 00:35 IST

विद्यार्थी ज्या वर्गात नापास होतो त्याच वर्गात त्याला पुन:प्रवेश घ्यावा लागतो.

अशोक पारधी पवनीविद्यार्थी ज्या वर्गात नापास होतो त्याच वर्गात त्याला पुन:प्रवेश घ्यावा लागतो. ही आतापर्यंतची प्रथा दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने नविन परिपत्रक निर्गमित केल्याने नववी नापास विद्यार्थ्यांना थेट अर्ज भरुन १० वीच्या परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे.इयत्ता नववीमध्ये नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून सन २०१४-१५ मध्ये इयत्ता नववी मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विहित अटींची पुर्तता केल्यास फार्म नं. १७ भरुन माध्यमिक शालांत परीक्षेला प्रविष्ठ होण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे. माध्यमिक शाळेत इयत्ता नववी मध्ये नापास झालेले विद्यार्थी पुन्हा इयत्ता नववी मध्येच दाखल होताच आणि इयत्ता नववी मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच इयत्ता दहावी मध्ये प्रवेश घेवून माध्यमिक शालांत परीक्षेला प्रविष्ठ होतात. असे विद्यार्थी इयत्ता नववी मध्ये नापास झाल्याने त्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाते. सदचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये म्हणून सन २०१५ मध्ये इयत्ता नववी मध्ये अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी जर खाजगीरित्या प्रविष्ठ होण्यासाठी अटींचे पालन करीत असतील तर अशा विद्यार्थ्यांना पुढील माध्यमिक शालांत परिक्षांना प्रविष्ठ होता येईल. असा शासन निर्णय झालेला असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक एन. के. जरग यांनी परिपत्रकाद्वारे विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी (माध्य.) व शाळा प्रमुखांना अशा ईच्छुक विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देण्याची सुचना केलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे हे शिक्षण विभागाचे उद्दिष्ट आहे.