शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर स्थानांतरणाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 05:00 IST

पाच दशकापूर्वी वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या ईटान गावाचे पुनर्वसन केले गेले. या पुनर्वसनांतर्गत ईटान गावापासून जवळपास २ कि.मी. अंतरावर ईटान-कऱ्हांडला मार्गावर जमीन उपलब्ध करून गावातील जवळपास ३०० कुटुंबांना भूखंड देण्यात आले. पुनर्वसनाअंतर्गत कुटुंबांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने गावातील अधिकतर कुटुंबांनी स्थानांतरणाला विरोध केला.

ठळक मुद्देईटान येथील नागरिकांत खळबळ : महसूल प्रशासनाच्या कारवाईची टांगती तलवार

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शासनाद्वारे पुनर्वसन केले जाऊनदेखील स्थानिक नागरिकांद्वारा स्थानांतरण न करण्यात आल्याने दरवर्षी पुराच्या प्रकोपाने स्थानिक ईटान येथील नागरिकांना विविध नुकसानीचा सामना करावा लागत आहे. या स्थितीत पुनर्वसित नागरिकांद्वारा स्थानांतरण न केल्या गेल्याने यंदाच्या पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे प्रभावित तथा क्षतिग्रस्त  कुटुंबांना शासनाद्वारे कोणतीही नुकसानभरपाई दिली जाणार नसल्याची धमकीपूर्ण नोटीस स्थानिक तलाठ्यामार्फत देण्यात आल्याने स्थानिक ईटान येथील नागरिकांत खळबळ माजली आहे.पाच दशकापूर्वी वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या ईटान गावाचे पुनर्वसन केले गेले. या पुनर्वसनांतर्गत ईटान गावापासून जवळपास २ कि.मी. अंतरावर ईटान-कऱ्हांडला मार्गावर जमीन उपलब्ध करून गावातील जवळपास ३०० कुटुंबांना भूखंड देण्यात आले. पुनर्वसनाअंतर्गत कुटुंबांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने गावातील अधिकतर कुटुंबांनी स्थानांतरणाला विरोध केला.गावातीलच काही कुटुंबांनी पुनर्वसनांतर्गत उपलब्ध जमिनीवर स्थानांतरण करून अन्य कुटुंबांना देण्यात आलेल्या प्लॉटवर देखील अतिक्रमण केले असल्याचा आरोप आहे. दरवर्षी गावात वैनगंगा नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्याने सर्व कुटुंबांच्या घरांसह शेतीचे नुकसान होत असते.  पूरपीडितांना नुकसानभरपाई दिली जाते. यंदा पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीत पीडित कुटुंबांना शासनाद्वारे कुठलीही मदत किंवा नुकसानभरपाई दिली जाणार नसल्याची नोटीस स्थानिक तलाठ्यामार्फत नागरिकांना देण्यात आल्याने खळबळ माजली आहे. ५० वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या पुनर्वसनांतर्गत स्थानांतरणासाठी स्थानिक तलाठ्यामार्फत नोटीस बजावण्यात आल्याने महसूल प्रशासनाविरोधात नागरिकांत रोष व्यक्त केला जात आहे.  पावसाळ्याच्या तोंडावर ईटान निवासी नागरिकांना पुनर्वसित जागेवर स्थानांतरणाची नोटीस बजावणाऱ्या तलाठ्याविरोधात  कारवाईची मागणी होत आहे.

 

टॅग्स :floodपूरriverनदी