शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

६३ स्कूल बसेस मालकांना परवाना निलंबनाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:38 IST

शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करणाऱ्या स्कूल बसेसची शाळा सुरू होण्यापूर्वी तपासणी करण्यात यावी,

१८५ नोंदणीकृत बसेस : १२२ बसेसची फेरतपासणीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करणाऱ्या स्कूल बसेसची शाळा सुरू होण्यापूर्वी तपासणी करण्यात यावी, असे न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार भंडारा उपप्रादेशिक परिवहन विभागाने १८५ नोंदणीकृत स्कूल बसेसपैकी १२२ बसेसेची फेरतपासणी केली आहे. अन्य ६३ बसेसच्या शाळांना परवाना निलंबनाची नोटीस बजावली आहे.यावर्षीच्या सत्रात जिल्ह्यात १८५ नोंदणीकृत वाहनांमधून विद्यार्थ्यांना ने-आण करण्यात येत आहे. वाहतुकीचे नियम लक्षात घेऊन या बसेसची दरवर्षी तपासणी करण्यात यावी, जेणेकरून या बसेसमुळे विद्यार्थ्यांना धोका होऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहे. हे काम उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे आहे. असे असताना ६३ स्कूल बसेस बाळगणाऱ्या शाळांनी बसेसची तपासणी केली नसल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.जिल्ह्यात १८५ स्कूल बसेस आहेत. त्या सर्व बस मालकांना किंवा शाळांना उपप्रादेशिक परिवहन विभागाने फेरतपासणी करण्याचे नोटीस बजावले आहे. त्यानुसार वाहनांची फेरतपासणी करणे गरजेचे होते. परंतु ६३ स्कूल बसेस मालकांनी तपासणी केलेली नाही. या बसेस मालकांनी वाहनांची तपासणी केली नाही तर त्यांचे परवाने रद्द करण्यात येईल, असेही उपप्रादेशिक परिवहन विभागाने सांगितले आहे.