शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उपकरणांमुळे नाही, तर वर्तनामुळे मनुष्याची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 01:15 IST

मोबाईलच्या विळख्यात अडकत चाललेल्या नविन पिढीबद्दल व देशात वाढत चाललेल्या विद्वेषाबद्दल चिंता वाढली आहे. नविन पिढीला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देहरीभाऊ केदार : पटेल महाविद्यालयात वार्षिकोत्सव

ऑनलाईन लोकमतभंडारा : मोबाईलच्या विळख्यात अडकत चाललेल्या नविन पिढीबद्दल व देशात वाढत चाललेल्या विद्वेषाबद्दल चिंता वाढली आहे. नविन पिढीला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. उपकरणांमुळे नाही तर वर्तनामुळे माणूस ओळखला जातो, असे प्रतिपादन नागपूर विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. हरीभाऊ केदार यांनी केले.जे. एम. पटेल महाविद्यालयात वार्षिकोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पी. पी. अध्यापक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. के. एम. भांडारकर, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विकास ढोमणे होते. मंचावर अधिष्ठाता व वार्षिकोत्सवाचे प्रभारी डॉ.कार्तिक पनिकर, स्टॉफ कॉन्सिलचे सचिव डॉ. उमेश बन्सोड, जे. एम. पटेल कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एस. एस. चानखोरे व विद्यार्थी परिषदेचे सचिव शुभम वनवे उपस्थित होते.प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी वर्ग प्रतिनिधींना सेवा व कर्तव्याची शपथ दिली. डॉ.विकास ढोमणे यांनी आपल्या प्रास्ताविकात रा.तु.म. नागपूर विद्याापीठाचे नवनिर्वाचित सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे व सरीता निंबार्ते याचें स्वागत केले. दिपाली शहारे व कल्याणी बेन्देवार या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या विद्यार्थीर्नींचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. ढोमणे यांनी प्रास्ताविक केले.विद्यार्थी परिषदेचे सचिव शुभम वनवे याने महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. यात महाविद्यालयाच्या विविध उल्लेखनीय बाबींचा व एनएसएस, एनसीसीच्या विविध उत्कृष्ट उपक्रमांचा उल्लेख केला.माजी प्राचार्य डॉ. के. एम. भांडारकर यांनी बहारदार भाषणाने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. तंत्रज्ञानाच्या वापरासोबत तंत्रज्ञान विकसित करण्याचे कौशल्यही आपण आत्मसात केले पाहिजे असे त्यांनी आवर्जून सांगितले. जातीपातीची बंधने तोडून विद्याथ्यार्नी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यष संपादीत करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले.बीएसस्सी ची विद्यार्थ्यांनी कु. नेहा हटवार हिने सादर केलेल्या सत्यम-षिवम-सुंदरम या सदाबहार गीताने रसिकांची मने जिंकली. याप्रसंगी आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या डॉ.अनिता जायस्वाल, डॉ. प्रकाष सिंग, डॉ. भारती बारापात्रे यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय, राज्य व विद्यापिठ स्तरावर उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच विद्यापीठाच्या व नागपूर बोर्डाच्या शांलात परिक्षेत विशेष नेत्रदीपक यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी पारीतोशीक देवून सत्कार करण्यात आला. वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.महाविद्यालयाचे अधिष्ठाता व वार्शिकोत्सवाचे प्रभारी डॉ.कार्तिक पनिकर यांनी आभार केले. कार्यक्रमाच्या यषस्वीतेसाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, एनएसएस व एनसीसीचे स्वयंसेवक, स्टुडंट कॉन्सिलचे सर्व सदस्य आदिंचे मोलाचे सहकार्य लाभले.