शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था भविष्यात ढासळणार

By admin | Updated: January 5, 2017 00:28 IST

केंद्र सरकारने नोटाबंदीचा जनतेवर लादलेला निर्णय अन्यायकारक असून भविष्यात या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतील, ...

गुडधे यांचा आरोप : केंद्राच्या निर्णयाविरूद्ध ७ रोजी मोर्चा भंडारा : केंद्र सरकारने नोटाबंदीचा जनतेवर लादलेला निर्णय अन्यायकारक असून भविष्यात या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतील, असा आरोप करून केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी काँग्रेस देशव्यापी आंदोलन करीत आहे. येत्या ७ जानेवारीला भंडारा येथे मोर्चा काढून या निर्णयाविरूद्ध निदर्शने करण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रफुल्ल गुडधे पाटील, जिल्हा प्रभारी मुजीब पठाण यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. प्रधानमंत्र्यांचा नोटबंदीचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून गुडधे पाटील म्हणाले, ५०० व १००० रूपयांच्या नोटा अचानक बंद केल्यामुळे नागरिकांना नानाविध अडचणींना सामोरे जावे लागले. ५० दिवसांचा कालावधी संपूनही नागरिकांना दिलासा मिळाला नाही. ग्रामीण भागात अर्थव्यवस्था विस्कळीत झाली असून शेतकरी, शेतमजुरांचे आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहेत. काळा पैसा, भ्रष्टाचार आणि बनावट नोटांच्या समस्यांवर निर्बंध घालण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी नोटबंदी लागू केली. परंतु समस्यातून देशातील आर्थिक व्यवहार अद्याप रूळावर आला नाही. अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करून ३१ डिसेंबर रोजी केलेल्या घोषणेतही सामान्यांना दिलासा मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. नगर परिषद निवडणुकीत भाजपचा जनाधार कमी झाला असला तरी या मुद्यांचा राजकीय लाभ काँग्रेसला घेता आला नाही. याची कारणमीमांसा करण्यात येत असून लवकरच संघटनात्मक फेरबदल करण्यात येणार असल्याचा सूचक ईशारा त्यांनी दिला.जिल्हा प्रभारी मुजीब पठाण म्हणाले, सरकारने नोटबंदीच्या निर्णयानंतर ६३ अध्यादेश काढले. त्यावरून सरकारचा नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता, असे सिद्ध होते. नोटबंदीनंतर सरकारने जितका काळा पैसा जमा केला, त्यापेक्षा एका स्मारकावर खर्च करीत आहेत. जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर म्हणाले, नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतर जिल्हा बँकांच्या स्थितीत सुधारणा आलेली नाही. पत्रपरिषदेला कार्याध्यक्ष मनोहर सिंगनजुडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, माजी नगराध्यक्ष बशीर पटेल, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, मार्कंड भेंडारकर, अजय गडकरी, महेंद्र निंबार्ते, भूषण टेंभुर्णे, अनिक जमा पटेल व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)