शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

अनुदानाची रक्कम भरूनही मोटारपंप नाही

By admin | Updated: April 3, 2016 03:49 IST

करडी येथील चार शेतकऱ्यांनी ५० टक्के अनुदानावर मिळणाऱ्या कृषी मोटार पंपासाठी १०० टक्के रक्कम कर्ज काढून भरली.

कृषी विभागाचा अजब कारभार : करडी येथील शेतकऱ्यांना मनस्तापकरडी (पालोरा) : करडी येथील चार शेतकऱ्यांनी ५० टक्के अनुदानावर मिळणाऱ्या कृषी मोटार पंपासाठी १०० टक्के रक्कम कर्ज काढून भरली. परंतु कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ना मोटारपंप मिळाले, ना पैसे मिळाले. जिल्हा कृषी अधिक्षक यांनी प्रश्न मार्गी न लावता तालुक्याच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देत आहे.कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत सप्टेंबर २०१५ मध्ये करडी येथील राधेश्याम बाबूराव साठवणे, भूपेंद्र रविकांत साठवणे, सीयाराम जयराम साठवणे, रजनी पुरुषोत्तम सेलोकर यांनी कृषी मोटारपंपसाठी कृषी विभागाकडे अर्ज केला होता. सदर योजना ५० टक्के अनुदानाची आहे. मात्र कृषी विभागाने शासनाच्या धोरणांचा हवाला देत लाभार्थ्यांकडून १०० टक्के म्हणजे २० हजार रुपये जमा करण्याचे निर्देश दिले. रक्कम भरणा केल्यानंतर १५ दिवसात पंप देण्याचे आश्वासन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले. मात्र डिसेंबर २०१५ मध्ये १०० टक्के रक्कम भरूनही मोटारपंप शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही. बाजारात त्याच पंपाची किंमत १० हजार रुपये असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र ५० टक्के अनुदान मिळणार असल्याने योजनेत पैसे भरले. लवकरच पंप मिळणार असल्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांनी वेळेवर रक्कम भरण्यासाठी मित्रांकडून हातउसणवारीवर कर्ज काढले. परंतु त्यांना अजूनही लाभ मिळालेला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.यासंबंधाने शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेशी प्रत्यक्ष भेट घेतली असता त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकाशी भेटण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पदरचे पैसे खर्च करून जिल्हा कृषी अधीक्षकांशी शेतकरी भेटले. मात्र प्रश्न सोडविण्यापेक्षा तुम्हीच पुरवठादार व तालुका कृषी अधिकाऱ्याशी बोलण्याचा सल्ला दिला. यामुळे शेतकऱ्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मोटारपंपची तातडीची गरज असताना ना पंप दिल्या जात आहेत, ना मागणी करूनही भरलेली रक्कम परत मिळत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कृषी विभागाच्या अशा अजब कारभारामुळे विभागाप्रती नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)