शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

ना ड्युटीचे निश्चित तास... ना कुटुंबीयांसाठी मिळतोय वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:36 IST

युवराज गोमासे करडी (पालोरा) : कोरोना महामारीचा भयंकर दुष्परिणाम दुसऱ्या टप्प्यात मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात पाहावयास मिळाला. परंतु अत्यंत ...

युवराज गोमासे

करडी (पालोरा) : कोरोना महामारीचा भयंकर दुष्परिणाम दुसऱ्या टप्प्यात मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात पाहावयास मिळाला. परंतु अत्यंत बिकट स्थितीतही करडी पोलिसांनी अपुरे मनुष्यबळ असतानाही १२ ते १४ तास काम केले. वेळप्रसंगी सहकाऱ्यांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळून कर्तव्य बजावले. त्यामुळे वेळेवर जेवण, झोप, स्वतःबरोबरच कुटुंबीयांचे आरोग्य व अन्य गरजा पूर्ण करण्यास ते असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे पोलिसांत मानसिक ताण-तणावाची बाब प्रकर्षाने समोर येताना दिसून येत आहे.

करडी परिसरात २५ गावांचा समावेश आहे. सुमारे ४० हजार लोकसंख्या आहे. दोन कारखाने आणि चार बाजारपेठा आहेत. करडी पोलीस स्टेशनअंतर्गत दोन अधिकारी आणि ४७ अंमलदारांची पदे मंजूर आहेत. सध्या मंजूर पदांपैकी दोन अधिकारी आणि दोन चालकांसह २३ अंमलदार कार्यरत आहेत. यात पाच महिला पोलीस शिपायांचा समावेश आहे. कोरोना महामारी सुरू असताना परिसरात दारू, जुगार, चोरी, किरकोळ दुखापत, घरफोडी, अपघात, बलात्कार व अपहरण यासारखे गुन्हे पोलिसांचा ताण-तणाव वाढविण्यास कारणीभूत ठरले. अपुरे मनुष्यबळ, त्यातच कामाचा ताण, तर दुसरीकडे जिवाची भीती पोलिसांना सतावताना दिसत आहे.

कोरोना संकट काळाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेकांचे आधार हरविले. काहींचे कुटुंब मृत्यूच्या जबड्यात गेले. ना मायेचा हात फिरला, ना स्वकियांची सोबत मिळाली. अखेरचे दर्शनही मिळाले नाही. सर्वांना जिवाची भीती वाटत असताना करडी पोलिसांनी जनजागृती मोहीम २५ गावांत राबविली. अनेकांना मदतीचा हात दिला. आपद्‌ग्रस्त कुटुंबीयांच्या हाकेला धावले. १२ तास कर्तव्याचे असताना १४ ते १८ तास राबले. दिवसाबरोबरच रात्रगस्ती केल्या. अनेक गुन्ह्यांचा वेळेत तपास केला. परंतु या सर्व प्रकारात ना ड्युटीचे निश्चित तास राहिले, ना कुटुंबीयांना वेळ देता आला.

पोलिसांना भेडसावणाऱ्या समस्या...

करडी येथे पोलीस ठाणे असले तरी, येथे शासकीय वसाहत नाही. घर देता का घर, अशी विचारणा केल्यावरही वेळेत किरायाचे घर मिळत नाही. बायको, मुले शहरात, तर पोलीस नवरा गावात, अशी परिस्थिती आहे. शिक्षण, आरोग्य आणि इतर जीवनावश्यक गरजांसाठी वारंवार शहरांकडे धाव घ्यावी लागते वा इतर सहकाऱ्यांना कामे सांगावी लागतात.

बदल्यांमुळे वाढणार घोळ

पाच वर्षे पूर्ण झालेले १२ कर्मचारी बदली होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु येणारे कर्मचारी लहान पोलीस ठाण्यात रुजू होण्याच्या मानसिकतेत नसतात. त्यामुळे आणखी घोळ होण्याची शक्यता आतापासूनच व्यक्त होताना दिसत आहे.

अपुऱ्या जागेत कार्यालयीन कामकाज

सध्या करडी पोलिसांचे कामकाज चौकीसाठी बांधलेल्या इमारतीतून चालविले जात आहे. कामकाज वाढले, परंतु जागा न वाढल्याने, कोरोना संकटात जिथे सोशल डिस्टन्स ठेवण्याचा सल्ला दिला जातो, त्या पोलिसांनाच अपुऱ्या जागेत बसून कार्यभार चालवावा लागत आहे. नवीन पोलीस ठाणे व कर्मचारी वसाहतीचे आश्वासन हवेतच विरल्याचा आभास होताना दिसत आहे.

कोट

पोलीस विभागाच्यावतीने दोन वर्षांपूर्वी पोलीस ठाण्याची इमारत व वसाहतीच्या बांधकामासाठी मोजमाप करण्यात आले होते. परंतु बांधकाम झाले नाही. करडी पोलीस स्टेशन येथे मंजूर पदांपेकी निम्मेच अंमलदार कार्यरत आहेत. कोरोना संकटात दगदग व ताण-तणाव वाढला आहे.

- विजय सलामे, सहायक पोलीस उपनिरीक्षक