शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
7
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
8
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
9
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
10
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
11
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
12
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
13
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
14
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
15
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
16
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
17
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
18
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
19
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
20
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!

ना सांत्वना, ना मायेच्या स्पर्शाचा आधार

By admin | Updated: April 5, 2017 00:20 IST

आयुष्यात सारे वादळ वारे अंगावर घेत ते गावातून स्थलांतरित झाले. अडचणी, जगण्याची जिद्द या आयुष्यात गरगर फिरत राहिले.

लोकमत मदतीचा हात : आभाळाच्या छत्रछायेत राहणाऱ्या धनराजला देवदूत गवसणार कां?मोहाडी : आयुष्यात सारे वादळ वारे अंगावर घेत ते गावातून स्थलांतरित झाले. अडचणी, जगण्याची जिद्द या आयुष्यात गरगर फिरत राहिले. जीवनात त्यांच्या नशिबी वेदना, दु:खच आले. जीवनाची वेल खुरटत असताना कुणीतरी सांत्वना देईल. मायेच्या स्पर्शाचा आधार देईल, या आशेने आजही ते बघत आहेत. परंतु मायाच संवेदनाहीन झाल्याने निळे आभाळ मुठीत घेऊन जीवन कंठणारे कुटुंब, हक्काची जागा व घरकूल कधी मिळेल याची आस लावून बसले आहे.गरीबीची जीवघेणी अवहेलना त्याची कास सोडत नाही. दोन घासाच्या अन्नासाठी त्यांना गाव सोडावं लागलं. नातेसंबंधांना पांगून तो मोहाडीत स्थिरावला. पण, आजही ते कुटुंब आशाळभूत नजरेने मायेच्या ओलाव्याची प्रतीक्षा करीत आहे. तब्बल २५ वर्षापासून तो हक्काची जागा व छोटसं घरकुल मिळावं यासाठी अनेकांपुढे हात पसरत आहे. मोहाडीत सुभाष वॉर्ड किंबहूना वाळीत टाकल्यागत गरीबीचे चटके सोसणारा धनराज नगरधने यांच्या परिवाराची हृदय हेलावून टाकणारे हे वास्तव आहे. जगणं संपन्न करण्यासाठी नात्यांचा ओलावा आवश्यक ठरतो. नाते विभक्त करताना क्लेश होतो. पण, नियती अन् परिस्थिती एकोपा तोडायला भाग पाडते. धनराजचेही असेच झाले. मुंढरी खुर्द येथून तो दोन दशकापूर्वी बाहेर पडला. कारण होतं गरीबी. कान्हळगाव (सिर), मोरगाव याठिकाणी त्याने आश्रय शोधला. त्याला रोजगार अन् आधार फारसा मिळाला नाही. धनराज पत्नीसह मोहाडीत स्थिरावला. भाड्याच्या घरात राहून मजूरी करून जीवन पुढे ढकलत होता. या घरातून त्या घरी गरागरा फिरत राहिला. आपण भाड्याने किती दिवस राहू, हा प्रश्न त्याला सतावत असताना हक्काची जागा मिळेल या हेतूने काही वर्षापूर्वी सुभाष वॉर्डात असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ झोपडी बांधली. नगरपंचायतीची निवडणुकीत भाडेकरूने (धनराज नगरधने) यांनी बाजूने मतदान केले नाही. या संशयावरून रात्रीच बाहेर काढले. रात्र कुठे काढणार? हा विचार येताच धनराजने संसाराचा पसारा घेत लेकराबाळांना झोपडीत आणले. आता तो त्याच झोपडीत स्थिरावला आहे. झोपडीला गवताचे पांघरुण, काड्या, कुडाच्या भिंती, आत एकच खोली, समोर स्वयंपाकाची जागा असा हा त्याचा निवारा. नदीकाठील मोकळे मैदान, डुकरांची वस्ती, झोपडीशेजारी पाण्याची टाकी, अंधारातील जीणे, वीज नाही, लुकलुकणारी दिव्यांच्या प्रकाशात आनंद मानणारा हा कुटुंब थंडी, वारा, उन्ह, पाऊस पाणी, वादळ सोसत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. विहिरीत श्वास रोखून, बुडी मारून तळचा दगड आणण्याची जिद्द ठेवणारी उर्मिला नावाची लेक शिक्षण घेत आहे. एक मुलगा मॅट्रीकला आहे. आईवडीलांची होणारी दमछाक, वेदना संपविण्यासाठी शिक्षण महत्वाचं असल्याच धनराजची पत्नी सांगत होती. आता आपली एकच आस मुलीनं शिकावे, मोठे व्हावे. फाटक्या झोपडीला हक्काचे स्थान यावे, एक सुंदर घरकूल बनावे अशी आशा आहे. गरीबांचे कुणी नसतात ती जाणीव त्यांना झालीय. नगर पंचायतीला निवेदन दिली. पण आजही त्याचा उपयोग झाला नाही. २ मार्च मोहाडीत नाना पटोले यांचा जनता दरबार भरला. धनराजच्या मुलीने परिवाराची व्यथा मांडत. सर, आम्ही केव्हाही मरू शकतो हे वाक्य खासदारांच्या काळजाला लागले. सगळेच एक वेळ स्तब्ध झाले. खा.पटोलेंनी मदत करण्याचे आश्वासन दिलेनिराधारांना मायेची सावली देण्याची, निस्वार्थ कर्म तेवढंच त्याग असेल तर मायेने आसवे पुसून जाण्याची उर्मी येते. पण इथे तर संवेदनाच मृत झाल्याने दुसऱ्यांच्या वेदना समजून त्यांना मदतीचा हात कोण देणार? धनराजचा चार जणांचा परिवार उपेक्षित जीवन जगत आहे. आता तरी मायेचा स्पर्श करून आधार देणारा कुणीतरी देवदूत गवसणार का? यांची त्यांना प्रतीक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)