शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

निर्मलग्राम, तंटामुक्त गाव समित्या कागदावरच

By admin | Updated: December 30, 2014 23:29 IST

गाव तंटामुक्त, निर्मलग्राम होतात, दारुबंदी केली जाते. परंतु, खऱ्या अर्थाने ही यशस्वीता कागदोपत्रीच दिसून येते. जी गावे तंटामुक्त झाली त्याच गावात हाणामाऱ्या होत असून निर्मल ग्राम झालेल्या

भंडारा : गाव तंटामुक्त, निर्मलग्राम होतात, दारुबंदी केली जाते. परंतु, खऱ्या अर्थाने ही यशस्वीता कागदोपत्रीच दिसून येते. जी गावे तंटामुक्त झाली त्याच गावात हाणामाऱ्या होत असून निर्मल ग्राम झालेल्या गावातच चोरटी दारु विक्री केली जात आहे. त्यामुळे पुरस्काराचे महत्व सवर्सामान्यापर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र दिसून येते. महात्मा गांधी तंटामुक्त गाव, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अशा विविध अभियानाच्या माध्यमातून शासन ग्रामीण भागातील गावागावात शांतता, स्वच्छता व व्यसनाधिनता दूर करण्याचा प्रयत्न दिसून येते. तंटामुक्तीचा पुरस्कार असो किंवा निर्मलग्रामचा पुरस्कार असो, गावांना प्राप्त झाल्यानंतर गावातील पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी त्या समस्यांकडे लक्ष दिलेले दिसून येत नाही. कोणत्याही समस्यांचे उच्चाटन करण्यासाठी शासनाकडून नेहमीच प्रयत्न केल्या जाते. मात्र ज्यावेळी कोणतीही योजना किंवा अभियान गावपातळीवर राबविण्यात येते त्यावेळी त्या योजनेकडे व अभियानाकडे पाहण्याचा हेतू बदलतो. अभियानात सहभागी व्हायचं आणि पुरस्कार मिळवायचा, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले जाते. अधिकारी गावात येणाच्या दिवशी गावात स्वच्छता करून अधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी गावकरी जमा होतात. संपूर्ण गावाला नववधू सारखे सजविले जाते. मात्र ती खरी वास्तविकता नसते. लाखो रुपयांचे पुरस्कार मिळवायचे आणि मग पुन्हा येरे माज़्या मागल्या. अशी अवस्था अनुभवायास मिळते. पुरस्काराचे पावित्र्य जपण्यासाठी ज्या गावाना निर्मलग्रामचे असो किंवा तंटामुक्तीचे पुरस्कार मिळाले आहे. त्या गावात केरकचरा जमा होऊ नये, गावात तंटे निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी प्रयत्नरत राहीले पाहिजे. मात्र याच्या उलट परिस्थिती दिसते. निर्मलग्राम झालेल्या गावात कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेली गटारे दिसतात. तर तंटामुक्त झालेल्या गावात तंटे त्याच बरोबर दारुबंदी झालेल्या गावात पुन्हा चोरटी दारु विक्री आदी प्रकार दिसून येत आहेत. काही मुठभर लोकांमुळे अनेक गावाना मिळालेल्या पुरस्काराला कलंक लागला आहे. (शहर प्रतिनिधी)