शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

निलज-कारधा रस्त्याचे पालटणार रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 23:39 IST

पर्यटनासाठी पवनी तालुका देश-विदेशात प्रसिद्ध आहे. परंतु दळणवळणाचा प्रमुख मार्ग असलेला निलज-कारधा राज्यमार्ग अरूंद असल्याने वाहतुकीस अडथळ्याचा आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने राज्य मार्गाची दखल घेवून निलज-कारधा रस्त्याची दर्जाेन्नती करण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे पवनीच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : पवनीच्या पर्यटन विकासाला चालना देणारा

अशोक पारधी ।आॅनलाईन लोकमतपवनी : पर्यटनासाठी पवनी तालुका देश-विदेशात प्रसिद्ध आहे. परंतु दळणवळणाचा प्रमुख मार्ग असलेला निलज-कारधा राज्यमार्ग अरूंद असल्याने वाहतुकीस अडथळ्याचा आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने राज्य मार्गाची दखल घेवून निलज-कारधा रस्त्याची दर्जाेन्नती करण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे पवनीच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.पवनी शहर प्राचीन व ऐतिहासिक नगर म्हणून गेल्या कित्येक शतकापासून महाराष्ट्राच्या नकाशावर झळकत आहे. भारतीय पुरातत्व विभागाने सन १९६९-७० मध्ये केलेल्या उत्खननात ईसापूर्व ४ च्या शतकातील महास्तुप शोधून काढला तेव्हापासून प्राचीन शहर म्हणून नगराची खरी ओळख पटली. त्यानंतर रूयाळ-सिंदपुरी येथे महासमाधीभीूमीची निर्मिती झाली आणि पवनीचा नाव आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचला. तालुक्यात घनदाट जंगल असल्याने वाघ, अस्वल, हरिण, निलगाय, बिबट असे प्राणी व विविध प्रकारचे पक्षी पूर्वीच होते परंतू उमरेड-कºहांडला-पवनी अभयारण्य मंजूर केल्यामुळे घनदाट जंगल पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले. राष्ट्रीय गोसेखुर्द प्रकल्प, नगरातील पंचमुखी गणेश, विदर्भातील अष्ठविनायकापैकी एक आहे. थरगीधर गणेश, रांझीचा गणपती, वैजेश्वर मंदीर, मुरलीधर मंदिर, चंडिका माता मंदिर असे प्रसिद्ध असलेले देवदेवतांचे मंदिर, भरूडस्तंभ, वैनगंगा नदीवर असलेले दिवाणघाट, वैजेश्वर घाट, पानखिडकी असे प्रसिद्ध घाट, भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेला जवाहर गेट व परकोट असे विविध स्थळ पर्यटकांना खुणावतात परंतु रस्ते आणि पर्यटकांसाठी परिसरात अल्प प्रमाणात असलेली निवास व्यवस्था यामुळे एकतर पर्यटक कमी संख्येने येतात.पर्यटकांची गैरसोय लक्षात घेवून पहिल्या हप्त्यात राज्यमार्गाची दर्जाेन्नती करण्याचा निर्णय राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने घेतला. निलज कारधा राज्यमार्ग १० मीटर रूंदीचा तयार करण्यात येणार आहे व त्याला राष्ट्रीय महामार्ग असा दर्जा प्राप्त होणार आहे.