शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
3
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
4
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
5
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
6
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
7
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
8
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
9
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
10
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
11
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
12
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
13
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
14
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
15
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
16
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
17
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
18
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
19
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
20
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?

स्मशानभूमीत रंगली ‘कवितेची एक रात्र’

By admin | Updated: April 28, 2015 00:29 IST

स्मशाने, प्रेतयात्रा, सरण रचणे, शोक विलाप हे कवितेचे पारंपरिक विषय असले तरी प्रत्यक्ष स्मशानभूमीतच कविमित्रांनी एकत्र येवून ...

रसिकांची उत्स्फूर्त दाद : परजिल्ह्यातील कवी व रसिकांची लक्षणीय उपस्थितीभंडारा : स्मशाने, प्रेतयात्रा, सरण रचणे, शोक विलाप हे कवितेचे पारंपरिक विषय असले तरी प्रत्यक्ष स्मशानभूमीतच कविमित्रांनी एकत्र येवून रात्रीच्या वेळेला कविसंमेलन रंगविणे ही बाब अत्यंत निराळी व अभिनवच मानली पाहिजे. जनमानसात स्मशानभूमीविषयी भीतीची भावना आहे. समाजातील ही भावना काही प्रमाणात कां होईना? नाहीशी करण्याच्या सांस्कृतिक हेतूने भंडारा येथील युगसंवाद वाड:मयीन सांस्कृतिक चळवळ आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भंडारा शाखेने वैनगंगा नदीच्या काठावरील स्मशानभूमी परिसरात शनिवारी रात्री कविसंमेलनाचे प्रबोधनपर आयोजन केले होते.या काव्य मैफलीच्या अध्यक्षस्थानी गझलकार प्रल्हाद सोनेवाने होते. अतिथी म्हणून कवी ह.रा. मोहतुरे, सी.एम. बागडे आणि अमृत बन्सोड हे उपस्थित होते. या मैफलीचे संचालन डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी केले.कविसंमेलनाच्या प्रारंभी मराठीचे ज्येष्ठ लेखक स्व. ना.रा. शेंडे यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून त्यांचे कृतज्ञ भावस्मरण करण्यात आले. कविसंमेलनात सर्वप्रथम डॉ. उमेश बन्सोड यांनी ‘मरणावर बोलू काही’ याच शिर्षकाची गझल सादर केली. या कविसंमेलनात सर्व उपस्थित कवींच्या कविता ‘मृत्यू’ या आशयाच्याच अविष्कार करणाऱ्या होत्या.या अभिनव कविसंमेलनात डॉ. गिरीश सपाटे, पवन कामडी, प्रमोदकुमार अणेराव, दयाराम बगमारे, महेश रोकडे, तुळशीदास चौधरी, जयकृष्ण बावनकुळे, गजेंद्र गजभिये, रेवाराम खोब्रागडे, दिनेश पंचबुद्धे, शीलवंत मडामे, सी.एम. बागडे, विनोद मेश्राम, वामन शेळमाके, ह.रा. मोहतुरे, नामदेव कान्हेकर, राहुल तागडे, मनोज केवट, मार्कंड नंदेश्वर, आसाराम शहारे, आलोक केवट, आशिष रंगारी, सुमंत रहाटे, डोमा कापगते, दिवाकर मोरस्कर, नरेश आंबिलकर आदी कवींच्या मृत्यूसंवेदनपर कवितांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. कविसंमेलाचे अध्यक्ष प्रल्हाद सोनेवाने यांनी मृत्यू संकल्पनेचा विविध प्रतिभा प्रतिमांनी वेध घेणारी एक आशयसमृद्ध गझल सादर करून या काव्य मैफलीचा उत्कर्ष साधला. या कविसंमेलनास महाविद्यालयीन युवकांसह रसिक मंडळींची लक्षणीय उपस्थिती होती. या कविसंमेलनात भंडारा शहरासोबतच लाखनी, साकोली, गोंदिया, लाखांदूर, पवनी आणि रामटेक येथील कवी व रसिक उपस्थित झाले होते. प्रारंभीचे प्रास्ताविक डॉ. अनिल नितनवरे यांनी तर आभारप्रदर्शन अंनिसचे विष्णुदास लोणारे यांनी केले. कविसंमेलनासाठी प्रा.नरेश आंबिलकर, प्रमोदकुमार अणेराव, अमृत बन्सोड, डॉ. प्रदीप मेश्राम, प्रा. जगजीवन कोटांगले, आसित बागडे, गुलशन गजभिये, दा.इ. प्रधान, बासप्पा फाये, प्रा. डॉ. जयश्री सातोकर, दिनेश कोटांगले, दिनेश बडवाईक यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)