शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात पुढील सरकार राकाँ-काँग्रेसची येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:50 IST

मागील पाच वर्षात भाजप - सेनेच्या सरकारने काहीच कामे केली नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेत जनतेला काहीच लाभ झाला नसून लोकसभा निवडणुकीचा विधानसभा निवडणुकीवर काहीच परिणाम होणार नाही.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : लोकसभा निकालाने विचलित होऊ नका, भाजप कार्यकर्त्यांचा राकाँत प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मागील पाच वर्षात भाजप - सेनेच्या सरकारने काहीच कामे केली नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेत जनतेला काहीच लाभ झाला नसून लोकसभा निवडणुकीचा विधानसभा निवडणुकीवर काहीच परिणाम होणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील सरकार हमखास राकाँ - काँग्रेसची येईल, असा दावा राकाँचे वरिष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी तुमसरात आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केला.गभणे सभागृहात आयोजित राकाँ पक्ष कार्यकर्त्यांच्या सभेला मंचावर माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आ.अनिल बावनकर, राकाँचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, माजी आमदार राजेंद्र जैन, प्रदेश सचिव तथा तथा माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, जिल्हा परिषद सभापती रेखा ठाकरे, राजू कारेमोरे, वासुदेव बांते, ठाकचंद मुंगुसमारे, राजू माटे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी आष्टी येथील भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत खा.प्रफुल्ल पटेल यांनी केले. प्रास्ताविक राकाँचे तुमसर-मोहाडी विधानसभा प्रमुख विठ्ठलराव कहालकर, तालुका अध्यक्ष देवचंद ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन माजी नगराध्यक्ष विजयकुमार डेकाटे तर आभार शहर राकाँ अध्यक्ष योगेश सिंगनजुडे यांनी मानले.सभेला नगरसेवक सलाम तुरक, राजेश देशमुख, सुनील थोटे, किरण अतकरी, विजय पारधी, सुरेश राहांगडाले, बबलू कटरे, मनोज वासनिक, दिलीप सोनवाने, रामदास बडवाईक, शैलेश साखरवाडे, प्रा.संजय बुराडे सह राकाँ पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल