संतोष जाधवर। लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण मिशन असलेल्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गत चार वर्षात कृषी विभागाने भरीव कामगिरी केली आहे. यात एकूण ३४१ गावांमध्ये झालेल्या जलयुक्त शिवारची २,७०४ कामे पूर्ण झाली असून जवळपास एक लाख ३३ हजार टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे. येणाऱ्या काही दिवसात पावसाने चांगली साथ दिल्यास अभियानांतर्गत निर्माणाधीन कामांमुळे संरक्षित क्षेत्र तयार होण्यास बळ मिळणार आहे.शेततळ्यांच्या कामात भरारीगत तीन वर्षांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ३४१ गावांमध्ये जलयुक्त शिवारची विविध प्रकारची कामे हाती घेण्यात आली. त्यावर ३१ मार्च २०१९ पर्यंत २६ कोटी ८० लाख रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. या गावांमध्ये या चार वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यासाठी सर्वात जास्त मजगी पुर्नजीवन, शेततळ्े व नाला खोलीकरणाच्या कामांवर भर देण्यात आला.
‘जलयुक्त’ने मिळणार नवसंजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:50 IST
संतोष जाधवर। लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण मिशन असलेल्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गत चार वर्षात कृषी ...
‘जलयुक्त’ने मिळणार नवसंजीवनी
ठळक मुद्दे३४१ गावांमध्ये राबवली योजना : भंडारा जिल्ह्यात १ लाख ३३ हजार टीएमसी पाणीसाठा