लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नववर्षाच्या स्वागताचा धांगडधिंगा टाळून दुग्ध पानाने नववर्ष साजरे करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले होते. त्यानुसार सोमवारी येथील त्रिमुर्ती चौकात मसाला दुधाचे वाटप करून एक आगळावेगळा उपक्रम राबविला. पोलीस हातात दुधाचे ग्लॉस घेवून वितरीत करीत असतानाचे चित्र पाहून अचंबित झाले होते.जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या संकल्पनेतून नववर्षाचे स्वागत मद्यप्राशनाने नव्हे तर दुग्ध पानाने हा उपक्रम राबविण्यात आला. सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस दलाच्यावतीने स्टॉल लावून येणाऱ्या जाणाºय वाहन धारकांना दुधाचे वाटप सुरू केले. या दुधासोबत वाहतूक नियमांची पत्रकेही देण्यात आली. मद्यप्राशनामुळे वाहन अपघाताची शक्यता अधिक असते. अनेक कुटुंब मद्यप्राशनाने उध्वस्त झाली आहे. नववर्षाच्या स्वागत करताना अनेकजण मद्यप्राशन करून भरधाव वाहन चालवितात. त्यामुळे धोका संभवतो. हा प्रकार टाळण्यासाठी शहरात उपक्रम राबविण्यात आला.
नववर्षाचे स्वागत दुग्धपानाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:30 IST
नववर्षाच्या स्वागताचा धांगडधिंगा टाळून दुग्ध पानाने नववर्ष साजरे करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले होते. त्यानुसार सोमवारी येथील त्रिमुर्ती चौकात मसाला दुधाचे वाटप करून एक आगळावेगळा उपक्रम राबविला. पोलीस हातात दुधाचे ग्लॉस घेवून वितरीत करीत असतानाचे चित्र पाहून अचंबित झाले होते.
नववर्षाचे स्वागत दुग्धपानाने
ठळक मुद्देपोलिसांचा उपक्रम : त्रिमूर्ती चौकात दूध वितरण