यावर्षी होऊ घातलेल्या दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत कोविड-१९ च्या अनुषंगाने मोठा बदल घडून आला असून, संबंधित परीक्षा केंद्र प्रवेशित शाळाच असणार आहे. बारावी विज्ञान, वाणिज्य व व्यावसायिक शाखांतील विषयांची श्रेणी, तोंडी व इतर अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहे.
दहावीतील विद्यार्थ्यांचे श्रेणी व तोंडीसह अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित शाळांना बहाल करण्यात आले आहे. दहावीच्या लेखी परीक्षा आटोपल्यानंतर शाळाअंतर्गत परीक्षा घेण्याची मुभा शाळांना देण्यात आली आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना नियमावलींचे पालन करून परीक्षा द्यावी लागणार आहे. पाण्याची बाटली, सॅनिटायझर, मास्क सोबत ठेवावा लागणार असून, गर्दी होणार नाही, याची शाळांना दक्षता घ्यावी लागणार आहे. अशाप्रकारे राज्य शिक्षण मंडळाने परिपत्रक काढले आहे.