शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवोदय विद्यालयासाठी नवीन ईमारतीचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:48 IST

अठरा वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर जिल्ह्याच्या वाट्याला लाभलेले नवोदय विद्यालय कदापी जाऊ दिला जाणार नाही. तात्पुरती का असे ना विद्यार्थ्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी वाट्टेल ते श्रम घेवू, असा आशावाद माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केला. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नवोदय विद्यालयाच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देनाना पटोले यांनी केली पाहणी : प्रशासनाला धरले धारेवर

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अठरा वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर जिल्ह्याच्या वाट्याला लाभलेले नवोदय विद्यालय कदापी जाऊ दिला जाणार नाही. तात्पुरती का असे ना विद्यार्थ्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी वाट्टेल ते श्रम घेवू, असा आशावाद माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केला. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नवोदय विद्यालयाच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते.तहसीलदार संजय पवार व विद्यालयाचे प्राचार्य व्ही.एस. अंबोरे यांनी नवोदय विद्यालयासाठी इमारत बघण्याचे कार्य केले असून ते लवकरच पूर्णत्वास नेऊन विद्यालय स्थानांतरीत करण्यात येईल, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. विशेष म्हणजे १ जुलै २०१८ पासून नवोदय विद्यालयाच्या नवीन शैक्षणिक सत्राला प्रारंभ झाला. इयत्ता सहावीचे ४० तर इयत्ता सातवीचे ४० विद्यार्थी या विद्यालयात ज्ञानार्जन करीत आहेत. जकातदार विद्यालय परिसरात असलेल्या ईमारतीमध्ये सुरू आहे. परंतु सदर ईमारत जीर्ण झाली असून ती ईमारत खाली करावी, असा आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याने काढला होता. विद्यार्थ्यांची सोय कुठे करावी, असा प्रश्न प्राचार्य व पालकांसमक्ष उभा झाला. याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यावर प्रशासनाने नवीन जागेचा शोध घेण्यास सुरूवात केली होती. मात्र आठवड्याभराचा कालावधी लोटूनही ईमारत उपलब्ध न झाल्याने संतप्त झालेल्या पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच मुलांना बसवू, असा इशारा दिला होता. सोमवारी माजी खासदार नाना पटोले यांनी नवोदय विद्यालयाला भेट देत पालकांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी जि.प.चे शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर, तहसीलदार संजय पवार, प्राचार्य अंबोरे यांच्यासह पालक उपस्थित होते. जिल्हा अल्पसंख्यक विभागांतर्गत येणारी एक ईमारत व अन्य एका ईमारतीबाबत चर्चा सुरू असल्याचे तहसीलदार संजय पवार यांनी पालकांना सांगितले.गणित, विज्ञान विषयाचे शिक्षक नाहीतनवोदय विद्यालय सुरू होवून एक वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. मागील सहा महिन्यांपासून गणित विषयाचे शिक्षक रजेवर असल्याने नवीन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. अशीच स्थिती विज्ञान विषयाच्या शिक्षकांबाबत आहे. दोन्ही विषय महत्वपूर्ण असल्याने शिक्षकांनी पदे तात्काळ भरण्यात यावी, अशी मागणीही पालकांनी रेटून धरली. विशेष म्हणजे नवोदय विद्यालयाच्या गंभीर प्रश्नाबाबत उपविभागीय अधिकाºयांनी दिलेले उत्तर निराशाजनक असल्याचेही पालकांनी यावेळी चक्क बोलून दाखविले.