शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

नूतन कन्याची ऋतूजा वाघाये अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:01 IST

जिल्ह्यात ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या निकालात यंदाही सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून अव्वल ठरलेली नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थी जागेश्वर वाघाये हिने दहावीच्या परीक्षेत बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४९२ गुण घेतले असून तिला खेळाचे आठ गुण मिळाले आहेत.

ठळक मुद्देदहावीचा निकाल ९४.४१ टक्के : १८ हजार ७०६ विद्यार्थी उत्तीर्ण, लाखनीची कीर्ती वाघाये आणि पवनीची आयुषी संयुक्त द्वितीय

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घोषित केलेल्या दहावीच्या निकालात भंडारा येथील नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी ऋतूजा जागेश्वर वाघाये ९८.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. जिल्ह्याचा निकाल ९४.४१ टक्के लागला असून १७ हजार ५६० विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ५७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात ७३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.जिल्ह्यात ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली. कोरोनामुळे भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या निकालात यंदाही सावित्रीच्या लेकींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून अव्वल ठरलेली नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थी जागेश्वर वाघाये हिने दहावीच्या परीक्षेत बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४९२ गुण घेतले असून तिला खेळाचे आठ गुण मिळाले आहेत. लाखनी येथील समर्थ विद्यालयाची विद्यार्थिनी कीर्ती किशोर वाघाये आणि पवनीच्या वैनगंगा विद्यालयाची विद्यार्थिनी आयुषी सुनील घावडे या दोघी ९८.२० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून आल्या आहेत. त्यांना बेस्ट आॅफ फाईव्हमध्ये ४९१ गुण मिळाले आहेत. तर तुमसर येथील शारदा विद्यालयाचा विद्यार्थी लौकीक योगेश पडोळे हा ९७.८० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून तृतीय आला आहे.जिल्ह्यातून १७ हजार ६४४ विद्यार्थ्यांनी परीक्षासाठी फार्म भरले होते. त्यापैकी १७ हजार ५६० विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी विशेष प्राविण्य श्रेणीत चार हजार ६१८, प्रथम श्रेणीत सात हजार ५७, द्वितीय श्रेणीत चार हजार ३८ आणि उत्तीर्ण श्रेणीत ८६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भंडारा जिल्हा विभागात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातून ८ हजार ५३१ मुली आणि ९ हजार २९ मुले परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८ हजार २३४ मुली म्हणजे ९६.५२ टक्के तर ८ हजार ३३४ मुले म्हणजे ९२.४१ टक्के उत्तीर्ण झालेत.लाखनी तालुका जिल्ह्यात प्रथमदहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी लाखनी तालुक्यातून उत्तीर्ण झालेत. या तालुक्यातून १७७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १७०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.०५ आहे. लाखांदूर तालुका जिल्ह्यात द्वितीय स्थानी आला असून या तालुक्यातून १७४७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १६७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.५९ आहे. भंडारा तालुक्यातून ३९५१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३७५३ म्हणजे ९४.९९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. साकोली तालुक्यातून २४०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २२७२ म्हणजे ९४.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मोहाडी तालुक्यातून २०२१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १८९४ म्हणजे ९३.७२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तुमसर तालुक्यातून ३२७८ विद्यार्थ्यांपैकी ३०६८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.५९ टक्के आहे. तर पवनी तालुक्याचा जिल्ह्यात सर्वात कमी ९२.८१ टक्के निकाल लागला.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल