शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नेरला उपसा सिंचन प्रकल्पावर धडकले ग्रामस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:43 IST

नेरला उपसा सिंचन योजनेमुळे परिसरातील चाळीस गावातील जवळपास सहा हजार हेक्टर शेतजमीनीला फायदा होतो. मात्र यासाठी जमीन संपादीत केलेल्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही त्यांच्या हक्काची सुविधा मिळालेली नाही.

ठळक मुद्देआजी-माजी आमदारांची मोर्चाला भेट : तोडगा निघता निघेना

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : नेरला उपसा सिंचन योजनेमुळे परिसरातील चाळीस गावातील जवळपास सहा हजार हेक्टर शेतजमीनीला फायदा होतो. मात्र यासाठी जमीन संपादीत केलेल्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही त्यांच्या हक्काची सुविधा मिळालेली नाही. पुनर्वसन आधी करावे नंतरच पाण्याची साठवणूक करावी, अशी मुख्य मागणी करीत दोन दिवसांनी परत एकदा नेरला वासीयांनी उपसा सिंचन प्रकल्पावर धडक मोर्चा नेला.दोन दिवसाआधी नेरला ग्रामस्थांनी उपसा सिंचन प्रकल्पाला कुलूप ठोकले होते. त्यामुळे पंपगृह बंद आणि येथील सुरु असलेले कामकाजही बंद पडले होते. यात सहायक अभियंता अमोल वैद्य यांनी कुलूप तोडले, अशी माहिती ग्रामस्थांना मिळाली. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पुन्हा एकदा या प्रकल्पावर धडक मोर्चा काढला. आमदार रामचंद्र अवसरे यांना याविषयी काहीच माहिती नसल्याचे शेकडो ग्रामस्थांसमोर मान्य केले. तसेच गावहितासंबधात दोन शब्द बोलून आल्यापावली परतले. त्यानंतर माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मोर्च्याचे नेतृत्व केले. यावेळी कार्यकारी अभियंता मेंढे, तहसीलदार सिध्दार्थ मेंढे, हेमंत कांबळे, एम. डी. वराडे, उपविभागीय पोलीस अधीकारी प्रभाकर तिक्कस, सुरेश ढोबळे, हरिदास पाल, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.