शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

माडगी पर्यटनस्थळाची शासनदरबारी उपेक्षा

By admin | Updated: November 21, 2015 00:37 IST

विदर्भाची पंढरी व मिनी कन्याकुमारी म्हणून प्रसिद्ध माडगी पर्यटनस्थळ शासनदरबारी उपेक्षित आहे.

तुमसर : विदर्भाची पंढरी व मिनी कन्याकुमारी म्हणून प्रसिद्ध माडगी पर्यटनस्थळ शासनदरबारी उपेक्षित आहे. चांदपूर देवस्थान व परिसराला राज्य व केंद्र शासनाने विकासाठी निधी दिला. परंतु, माडगीला एक छदामही न दिल्याने भक्तांसोबतच परिसरातील नागरीकांत प्रचंड असंतोष धुमसत आहे. बारमाही वाहणारी वैनगंगा नदीपात्राच्या मध्यभागी २०० फूट शिळेवर भगवान नृसिंह व वीरसिंहाचे प्रसिद्ध मंदिर आहे. प्राचीन आख्यायिका येथे विदित आहे. कार्तिक एकादशीला १५ दिवसांची यात्रा मागील १०० वषार्पासून भरत असल्याचा इतिहास आहे. राज्य शासनाने मंदिर परिसराच्या विकासाकरिता २०१२ मध्ये केवळ ३ लक्ष देण्याची घोषणा केली होती. तुमसर-भंडारा राज्य महामार्ग व मुंबई- हावडा रेल्वे मार्गावर हे तीर्थस्थळ आहे. परंतु याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. चांदपूर मंदिर व परिसर पर्यटनाकरिता केंद्र व राज्य शासनाने विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला. तेव्हा माडगी तीर्थस्थळ व पर्यटनस्थळाला सुध्दा निधी मिळणार अशी अपेक्षा होती. परंतु येथे भ्रमनिरास झाला. नदीच्या मध्यभागी हे स्थळ असल्याने हे स्थळ सर्वांना आकर्षित करते. एमटीडीसीने बोटिंगची व्यवस्था केली तर स्थानिकांना रोजगारसुद्धा प्राप्त होऊ शकते. या स्थळाला भगवान राम, लक्ष्मण, सीता, वनवासात असताना काही काळ या शिळेवर घालविले होते अशी आख्यायिका आहे. या मंदिराला समर्थ रामदास, तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, विनोबा भावे यांनी भेट दिली आहे. मुंबई - हावडा मार्गावरील रेल्वे पुल तयार करतांना इंग्रज अधिकाऱ्यांनासुध्दा या स्थळाने भुरळ घातली होती. या मंदिरात संत अण्णाजी महाराजांनी सुमारे ३० वर्षे वास्तव करुन समाजप्रबोधन करुन नवीन पिढीचा पाया घालून दिला. शासनाने विशेष लक्ष देण्याची मागणी पर्यटन प्रेमींनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)