शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

पवनीतील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित

By admin | Updated: July 26, 2016 00:50 IST

ऐतिहासीक वारसा लाभलेल्या पवनी नगरात शेकडो मंदीर, वैनगंगा नदीवरील घाट, परकोट, गरूडखांब व उत्खननात सापडलेले ...

दिवाणघाट ढासळणार : घाट दुरूस्तीसाठी नगर पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधीनी शासनाकडे प्रयत्न करण्याची गरजअशोक पारधी पवनीऐतिहासीक वारसा लाभलेल्या पवनी नगरात शेकडो मंदीर, वैनगंगा नदीवरील घाट, परकोट, गरूडखांब व उत्खननात सापडलेले भव्य स्तुप अशा कित्येक वास्तू पुरातत्व विभागाने जतन करून देखभाल करावी, अशा आहेत. त्यापैकी एक असलेला प्रसिद्ध दिवाणघाट आहे. प्रशासनाकडून दुर्लक्षित असल्याने ढासळण्याचे स्थितीत आलेला आहे.वैनगंगा नदीवरील घाटामुळे नगराचे सौंदर्यात भर पडलेली आहे. संपूर्ण विदर्भात पवनीनंतर आंभोरा व मार्कंडा या ठिकाणी वैनगंगा नदीवर घाट बांधलेले आहेत. घाटाचे बांधकाम करण्यात आल्याने पर्यटक सहजरित्या नदीपात्रापर्यंत पोहचू शकतात. स्रान व उर्वरित धार्मिक कार्य करण्यासाठी सोयीचे आहे. परंतू घाट ढासळले तर कोणतेही सरकार नव्याने नदीवर घाट बांधकाम नाही. त्यामुळे ऐतिहासीक वारसा जतन करण्यासाठी पुरातत्व विभाग, बांधकाम विभाग किंवा लोकप्रतिनिधींचा स्थानिक विकास निधी खर्च करून घाटांची दुरूस्ती करण्यात यावी, नगराचे उत्तरेला वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर दिवाणघाट, पानखिडकी घाट, वैजेश्वर घाट व ताराबाईचा घाट आहे. त्यापैकी आतापर्यंत लक्षावधी रूपयांचा निधी खर्च करून वैजेश्वर घाट सुस्थितीत ठेवण्याचा पर्यटन करण्यात आलेला आहे. पवित्र असे वैजेश्वराचे मंदीर, स्मशानघाट असल्याने स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी त्या स्थळासाठी पर्यटन विकास निधी तसेच स्थानिक विकास निधी खर्च केलेला आहे. दिवानघाट सुद्धा फारपूर्वी पवनीकरांचे आकर्षण होते. नगरातील सर्व नागरिक स्रानासाठी दिवाणघाटावर जात असत. सकाळी घाटावर वर्दळ असायची. अलीकडे घाट ढासळण्याचे स्थितीत असल्याने भितीपोटी नागरिकांचे जाणे बंद झाले आहे. दिवानघाटाचे सौंदर्य अद्यापही पर्यटकांना आकर्षित करणार आहे. ढासळलेले बुरूज व ढासळू पाहणारे घाट दुरूस्तीसाठी नगर पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधीनी शासनाकडे प्रयत्न करावे, असे जनतेला वाटत आहे. आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे पवनीवासीय असल्याने स्थानिक पातळीवरील समस्या मागणीशिवाय सुटाव्यात, अशी मागणी आहे.