शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पवनीचा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:18 IST

विदर्भासाठी पर्यटनाचे प्रमुख केंद्र होण्याची क्षमता असलेल्या पवनी नगरातील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे. शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी अनेकदा पाहणी केली.

ठळक मुद्देना लोकप्रतिनिधींचे लक्ष ना सरकारचे : अन्यथा हा वारसा ठरणार छायाचित्रापुरता

अशोक पारधी ।आॅनलाईन लोकमतपवनी : विदर्भासाठी पर्यटनाचे प्रमुख केंद्र होण्याची क्षमता असलेल्या पवनी नगरातील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे. शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी अनेकदा पाहणी केली. पर्यटन विकास निधीतून ढासळत असलेल्या घाटांचे पुनरूज्जीवन करण्याचा संकल्प केला. मात्र जबाबदारी घेणार कोण? असा प्रश्न निर्माण झाल्याने पुनरजीवनाचा संकल्प हवेतच विरला आहे.पवनी नगर व परिसर पर्यटन स्थळांनी समृध्द आहे. महत्वाकांक्षी असलेल्या गोसेखुर्द प्रकल्प, उमरेड- पवनी-कऱ्हांडला अभयारण्याचा महत्त्वपूर्ण भाग, सिंदपुरी रूयाळ येथील आंतरराष्ट्रीय महासमाधीभूमी परिसर, अष्टविनायकापैकी एक पंचमुखी गणेश मंदिर, स्वयंभू धरणीधर गणेश, रांझीचा महाकाय गणपती, वैजेश्वर मंदिर, जगन्नाथ स्तुप, चंडिकापूर स्तुप, ऐतिहासिक परकोट व जवाहरगेट आणि दैनावस्था झालेला दिवाणघाट व नगरातील मंदिर असा व्यापक पसारा असलेला पर्यटन स्थळांचा महत्त्वपूर्ण गाव आहे. पंरतु पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सुविधा मात्र येथे नाहीत. कोणत्याच लोकप्रतिनिधींना पर्यटन विकासाची ईच्छशक्ती नसल्यामुळे दिवाण घाटासारखा ऐतिहासिक वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.भारतीय पुरातत्व विभागाने जवाहर गेट व परकोट याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे त्या स्थळांची देखभाल दुरूस्ती होत आहे. वैजेश्वर घाटाला महत्त्व दिल्याने लोकप्रतिनिधी व पर्यटन विकास निधीमधून काही प्रमाणात विकास झालेला दिसतो. पंरतु दिवाणघाट, पानखिडकी हे घाट अद्यापही विकासाच्या प्रतिक्षेत आहेत.भारतीय पुरातत्व विभाग महाराष्ट्र पर्यटन विकास, नगर पालिका प्रशासन यापैकी कोणीतरी नामशेष होत असलेल्या या घाटांच्या पुनरुज्जीवनासाठी जबाबदारी घ्यावी, पर्यटनाला चालना देऊन पवनी शहराचा विकास करण्याचा संकल्प केला तरच पर्यटनाच्या नकाशावर पवनीचे नाव कोरल्या जाईल. अन्यथा आठवणी तेवढ्या छायाचित्रापुरते शिल्लक राहतील, यात शंका नाही.