शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्द प्रकल्पासाठी सात हजार कोटींची गरज

By admin | Updated: December 27, 2014 22:44 IST

राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित असलेल्या भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाला मागील दोन वर्षात केंद्र सरकारतर्फे छदामही मिळाला नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी आता

धरणाला प्राधान्य : नाना पटोले यांची पत्रपरिषदेत माहिती भंडारा : राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित असलेल्या भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाला मागील दोन वर्षात केंद्र सरकारतर्फे छदामही मिळाला नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी आता पुन्हा सात हजार कोटी रुपयांची गरज आहे. ही रक्कम उपलब्ध झाल्यास पाच वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास येईल, अशी माहिती खासदार नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. यावेळी ते म्हणाले, गोसीखुर्द प्रकल्पाचे काम मागील २५ वर्षांपासून सुरु आहे. या कालावधीत प्रकल्पाची किंमत ३२७ कोटी रुपयाहून १४ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मागील मार्च महिण्यात नविन प्रस्तावाला मान्यता मिळाली होती. प्रकल्पाच्या बांधकामासाठी आतापर्यंत सात हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी पुन्हा सात हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. आतापर्यंत झालेल्या प्रकल्पाच्या बांधकामाची पाहणी काही दिवसांपूर्वी केंद्राच्या चमूने केली होती. त्यांनी या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल केंद्र शासनाला दिला. त्यामुळे केंद्र सरकारने मागील दोन वर्षांपासून प्रकल्पाला एकही निधी दिला नाही. यापूर्वीच्या केंद्र सरकारने १,९०० कोटी रुपयांचे अनुदान घोषित केले होते. तथापि, प्रकल्पाच्या बांधकाम निधीची कमतरता असल्यामुळे बांधकाम रखडण्याची शक्यता होती. त्यामुळे लोकसभेत हा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर केंद्रीय जलसंसाधनमंत्री उमा भारती यांची भेट घेऊन चर्चा केली. यात देशात गोसीखुर्द सारखे नऊ राष्ट्रीय प्रकल्प आहे. ज्यातील अनेक प्रकल्पाचे कामदेखील सुरु झालेले नाहीत. ना.उमा भारती यांनी गोसेखुर्द प्रकल्पाला लवकरच निधी देण्यात येईल, असे सांगितले. गोसीखुर्द प्रकल्पबाधितांच्या समस्या लक्षात घेऊन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली. यावेळी आपण पुर्नवसनावर भर दिला. नविन पुर्नवसन धोरणानुसार प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देणे. पुनर्वसनग्रस्तांना राज्य शासनाच्या १८ नागरी सुविधा असताना केंद्र शासनाने २३ नागरी सुविधा देण्यावर भर दिला आहे. गर्रा बघेडा विकास आणूखासदार दत्तक ग्राम योजनेत घेतलेले तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा येथील पन्नास टक्के नागरीक दारीद््रय रेषेखाली आहेत. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांचा लाभ या गावाला मिळणार आहे. याशिवाय माईल परिसरातील आठ ते दहा गावे दत्तक घेणार असून त्याठिकाणी माईलचा सीएसआरचा निधी खर्च करणार आहे. पत्रपरिषदेला आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत ईलमे, आरीफ पटेल, संजय मते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)