शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 22:32 IST

भारतात विविध जाती व धर्माचे लोक गुण्यागोंविदाने एकत्र नांदतात. प्रत्येकाची पंरपरा वेगळी असली तरी विविधतेतून एकता दर्शविणारी भारतीय संस्कृती ही एकमेव आहे. त्यामुळेच जग भारताकडे केवळ सैन्यदल, आर्थिक स्थिती, युवकांचा देश म्हणून नव्हे तर एकात्मता जपणारा देश म्हणून पाहते. त्यामुळेच प्रत्येकाने आपली संस्कृती आणि मूल्य जोपासून संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी गोंदिया येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देकमलनाथ : मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रम, १४ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विविध मान्यवरांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारतात विविध जाती व धर्माचे लोक गुण्यागोंविदाने एकत्र नांदतात. प्रत्येकाची पंरपरा वेगळी असली तरी विविधतेतून एकता दर्शविणारी भारतीय संस्कृती ही एकमेव आहे. त्यामुळेच जग भारताकडे केवळ सैन्यदल, आर्थिक स्थिती, युवकांचा देश म्हणून नव्हे तर एकात्मता जपणारा देश म्हणून पाहते. त्यामुळेच प्रत्येकाने आपली संस्कृती आणि मूल्य जोपासून संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी गोंदिया येथे व्यक्त केले.भंडारा-गोंदिया जिल्ह्यात शिक्षणाची गंगा आणणारे मनोहरभाई पटेल यांच्या ११३ व्या जयंती निमित्त शालेय व पदव्युत्तर अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण घेवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्व.मनोहरभाई पटेल सुवर्ण पदक वितरण कार्यक्रम शनिवारी गोंदिया येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रागंणावर आयोजित करण्यात आला होता. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेता संजय दत्त, प्रसिध्द उद्योगपती वेदांना ग्रुपचे अनिल अग्रवाल, किरण अग्रवाल होते. अध्यक्षस्थानी खा. प्रफुल्ल पटेल होते. या वेळी मध्यप्रदेशचे खनिकर्म मंत्री प्रदीप जायस्वाल, मध्यप्रदेश विधानसभा उपाध्यक्ष हिना कावरे, खा.मधुकर कुकडे, अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री अनिल देशमुख, आ. गोपालदास अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, नगराध्यक्ष अशोक इंगळे, भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, नाना पंचबुध्दे, विलास श्रृंगारपवार, टामलाल सहारे, माजी खा.विश्वेश्वर भगत, आ. संजय उईके, माजी आमदार अनिल बावणकर, रामरतन राऊत, सेवक वाघाये, दिलीप बन्सोड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, मनोहरभाई पटेल अ‍ॅकडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात स्व.मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी कमलनाथ म्हणाले, मनोहरभाई पटेल केवळ राजकिय नेते नव्हे तर सामाजिक नेते होते. शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी शिक्षण संस्थाची स्थापना केली. दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खºया अर्थाने दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रफुल्ल पटेल यांनी सुध्दा शैक्षणिक संस्थाचा विस्तार करुन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली. दोन्ही जिल्ह्यात दर्जेदार शिक्षण संस्था असल्याचा गौरव वाटत असल्याचे सांगितले. प्रफुल्ल पटेल म्हणाले, कमलनाथ जेव्हा केंद्रीय मंत्री होते तेव्हा त्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील अनेक योजना मार्गी लावण्यासाठी मदत केली. त्यांच्यामुळे गोंदिया येथे अंडरग्राऊंड योजनेला मंजुरी मिळाली. यापुढेही त्यांचे या दोन्ही जिल्ह्यात उद्योग व सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निश्चित सहकार्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. खासदार कुकडे म्हणाले कमलनाथ मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री झाल्याने भंडारा जिल्ह्यातील बाघोली प्रकल्प मार्गी लागेल असे म्हणाले. आमदार गोपाल अग्रवाल म्हणाले, यापूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री गोंदियाचे जावई होते. मात्र डांर्गोली सिंचन प्रकल्प मार्गी लागू शकला नाही. मात्र आता मुख्यमंत्री कमलनाथ असल्याने तो निश्चितपणे मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त केला. नाना पटोले यांनी महाराष्टÑातील विद्यमान सरकार शैक्षणिक संस्थामध्ये सुध्दा भेदभाव करीत आहे. मात्र सर्व शैक्षणिक संस्थानी हा प्रयत्न हानून पाडून शिक्षणाच्या क्षेत्रात सुधारणा करण्याचे आवाहन केले. संचालन राजेंद्र जैन यांनी केले.भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील गुणवंतांचा सत्कारशालांत तसेच उच्च माध्यमिक आणि पदव्युत्तर परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांचा या वेळी उपस्थित मान्यवरांच्या स्व.मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्ण देऊन गौरविन्यात आले. यात गुजराथी नॅशनल हायस्कुलची विद्यार्थिनी मेघा बिसेन, अर्जुनी मोरगाव येथील जी.एम.बी.हायस्कुलची अवंती राऊत, शांताबेन मनोहरभाई पटेल कनिष्ठ विद्यालयाचा समर्थ वरु, सरस्वती कनिष्ठ विद्यालयाचा जयंत लोणारे, एनएमडी विद्यालयाची विद्यार्थिनी रक्षदा पशिने, संदेश केडिया, तिरोडा येथील सी.जे.पटेल विद्यालयाची कल्पना भगत, सानिया ताहिर अली हुसैन, शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालयाचा रितेश हर्षे, साकोली येथील मनोहरभाई पटेल कनिष्ठ विद्यालयाचा गुलशन शहारे, भंडारा येथील जे.एम.पटेल विद्यालयाची निलीमा चौधरी व प्रज्वल राजपूत, एमआयटी शहापूरची विद्यार्थिनी साक्षी घावले, जागृती अग्रवाल यांचा समावेश होता.सर्वांगीण विकासासाठी मोठे उद्योग उभारा -प्रफुल्ल पटेलमनोहरभाई पटेल जयंती निमित्त मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि वेदांता ग्रुपचे प्रसिध्द उद्योजक अनिल अग्रवाल हे गोंदिया येथे आले होते. या वेळी प्रफुल्ल पटेल यांनी कमलनाथ आणि अग्रवाल यांच्याकडे भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगिन विकासासाठी मोठे उद्योग स्थापन करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. तसेच मध्यप्रदेश व छत्तीसगडप्रमाणेच महाराष्टÑातील शेतकºयांना सुध्दा धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करण्याची भावनिक मागणी प्रफुल्ल पटेल यांनी केली. कमलनाथ यांनी यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.भंडारा-गोंदिया जिल्ह्यांतील युवकांना रोजगार -अग्रवालगोंदियांचे आंतरीक आणि बाह्य सौंदर्य पाहुन आपण खरोखरच गोंदियाच्या प्रेमात पडलो.गोंदिया शिक्षण संस्थेव्दारा संचालित या जिल्ह्यात अनेक दर्जेदार शैक्षणिक संस्था पाहुन मला आश्चर्य वाटले. वेदांता ग्रुपच्या माध्यमातून गोंदिया-भंडारा जिल्ह्यात कुठला उद्योग सुरू करता येईल यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार. तसेच पुढील वर्षी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आपल्या उद्योगात रोजगार देण्यासाठी मुलाखती घेऊन संधी देण्याची ग्वाही वेदांता उद्योग समुहाचे अनिल अग्रवाल यांनी दिली.वर्षा पटेल यांना उमेदवारी देऊन टाकाप्रफुल्ल पटेल यांच्याप्रमाणेच वर्षा पटेल यांनी मनोहरभाई पटेल अ‍ॅकडमीच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि शैक्षणिक कार्याशी जुडल्या आहेत. त्या प्रत्येकाशी आदरभावाने वागत असून सर्वांना ओळखत असल्याचे आपण पाहिले. त्यांचा व्यापक जनसंपर्क पाहता आगामी निवडणुकीत वर्षा पटेल यांना उमेदवारी देऊन टाका असा विनोदात्मक सल्ला उद्योजक विनोद अग्रवाल यांनी प्रफुल्ल पटेल यांना दिला.ये माँ कितना तोला, बोले तो पच्चास तोला.....संजय दत्त यांनी उपस्थितांचे प्रेम पाहुण त्यांचा आदर करीत वास्तव चित्रपटातील एक डॉयलाग सादर केला. ये माँ क्या टुकुर टुकुर देख रही.... ये कितने तोला है मालूम है क्या पुरा पच्चास तोला, कितना तोला पच्चास तोला हा डॉयलाग सादर करताच उपस्थितांनी संजूबाबा संजूबाबा अशा घोषणा दिल्या. तसेच मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील डॉगलाग सादर करुन उपस्थितांचे मन जिंकून घेतले.संजूबाबाला स्ट्रॉबेरी व ड्रॅगन फ्रुटची भूरळगोंदिया जिल्ह्यात स्ट्रॉबेरी आणि ड्रॅगन फळाची शेती होत असल्याची कल्पना आपण केली नव्हती. मात्र येथे आल्यानंतर वर्षा पटेल यांनी स्ट्रॉबेरी आणि ड्रॅगन फ्रुट चाखण्यास दिले. यावर संजय दत्त यांनी आपल्या स्टाईलमध्ये भाभी यहा की स्ट्राबेरी बोले तो एकदम झकास....असे सांगितले. आपण जेव्हा केव्हा येऊ तेव्हा निश्चित यांची मागणी करु असे संजय दत्त यांनी सांगितले. तसेच गोंदिया जिल्ह्याला नैसर्गिक सौंदर्य लाभले असून लोनावळा, खंडाळा जाण्यापेक्षा प्रफुल्ल पटेल यांनी फिल्म गोंदिया जिल्ह्यात चित्रपट नगरी स्थापन करण्यासाठी पुढाकार हा परिसर सुध्दा फिल्म फ्रेन्डली करण्याची मागणी केली.