शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

नेहमी सावध राहाणे ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 23:28 IST

अधिकार आणि कर्तव्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अधिकाराची पायमल्ली होत असेल तर संविधानाच्या कायद्यातील तरतुदीनुसार हक्क मिळू शकतात.

ठळक मुद्देसंजय देशमुख यांचे प्रतिपादन : वरठीत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी: अधिकार आणि कर्तव्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अधिकाराची पायमल्ली होत असेल तर संविधानाच्या कायद्यातील तरतुदीनुसार हक्क मिळू शकतात. कायद्याने अधिकार व हक्क सुरक्षित राहू शकतात. कर्तव्याची जाणीव ठेवून वागलो तर अधिकराची पायमल्ली होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येकाने अधिकार मागताना मानवी मूल्याचे जतन करण्यासाठी कर्तव्य पाळणे गरजेचे आहे. मानवी प्रवृत्तीतील राक्षस जागा झाला की सर्व घोळ निर्माण होतो. मानवी प्रवृत्तीतील राक्षस केव्हा जागा होईल याचा अंदाज लावणे कठीण आहे. म्हणून सभोवताल घडणाºया घटनांपासून बचावासाठी अखंड सावधान असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा व स्वर्गीय पार्वताबाई मदनकर कला व वाणिज्य महाविद्यालय वरठीच्यावतीने आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी ते म्हणाले, आजूबाजूला घडणाºया अनेक अनुचित घटना या आपल्या परिचितांकडून केल्या जातात. लैगिक अत्याचारासारख्या घडणाºया सर्वाधिक घटना या परिचितांमार्फत झाल्याचे अनेक उदाहरण आहेत. लैंगिक अत्याचारापासून सावधानता म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करणे नसून त्याबाबत सजग राहणे आहे. सुरक्षेकरिता नियमित सावध राहणे आहे.अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश -१ आर पी पांडे, जिल्हा न्यायाधीश -२ एन. व्ही. जिवने, जिल्हा न्यायाधीश -३ एस. बी. भन्साली, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. जे. भट्टाचार्य, सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) एस. के. साबळे, सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) डी. एम. धालीवाल, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) पी. बी. येर्लेकर, तिसरे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) एस. एच राठी, चौथे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) पी. डी. मेंढे, नवनिर्माण संस्थेचे सचिव अ‍ॅड. कैलास भुरे, अध्यक्ष मिलिंद मदनकर उपस्थित होते.सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. जे. भट्टाचार्य यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना अनेक उदाहरण देऊन यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबीची माहिती दिली. जीवनात अनेक रहस्यमय घडामोडी घडतात, पण त्यावर मात करणे हे शेवटी आपल्या हातात असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या युगातील मांजर आडवी गेल्याच्या म्हणजे आपण आपल्या सभोवताल असणाºया सुविधांचा जास्त प्रमाणात वापर केल्यास आयुष्यात अडथळे येतात असे सांगितले. म्हणून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक प्रमाणात करून शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. संचालन प्रा.आशिष बोरकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रा अविनाश नवखरे , प्रा रजनी भुरे, प्रा मधुकर गोमासे, संगीता वखालकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे डी आर. भुरे उपस्थित होते.