शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासातील कर्तबगार महिलांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 21:46 IST

भारताला तंत्रज्ञान, शिक्षण, विज्ञान, साहित्य, राजनिती, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठा वारसा लाभला आहे. भारतीय महिला स्वातंत्र्य सेनानी, खेळाडू, शास्त्रज्ञ, समाजसेविका, अभिनेत्री आणि नेत्यांनी भारताचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविले आहे.

ठळक मुद्देलक्ष्मण मोकासरे : चिचाळ येथे मुलगी वाचवा, मुलगी शिकवा जनजागृती कथापथक

लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : भारताला तंत्रज्ञान, शिक्षण, विज्ञान, साहित्य, राजनिती, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठा वारसा लाभला आहे. भारतीय महिला स्वातंत्र्य सेनानी, खेळाडू, शास्त्रज्ञ, समाजसेविका, अभिनेत्री आणि नेत्यांनी भारताचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविले आहे. अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, रमाई, सायना, नेहवाल, साक्षी मलीक अशा काही इतिहासातील आणि अलीकडच्या कर्तबगार महिलांचा आदर्श ठेवा, असे प्रतिपादन शिवशाहीर लक्ष्मण मोकासरे यांनी केले.महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना महिला व बालविकास विभाग अंतर्गत जयभवानी कलापथक मंडळ औरंगाबाद, शिवशाहीर लक्ष्मण मोकासरे व शाहीर कार्तीक मेश्राम यांच्या वतीने मुलगी वाचवा, मुलगी शिकवा लोकपथक ग्रामपंचायत चौक चिचाळ येथे सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लोपमुद्रा वैरागडे होत्या. यावेळी उपसरपंच मंजुषा गभणे, जयराम दिघोरे, प्तुकेश वैरागडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण काटेखाये, मोना तिभागेवार, वर्षा काटेखाये, भूमिका लोहकर, गंगू मांडवकर, जिभकाटे, पडोळे, रुपचंद उके आदी उपस्थित होते.शाहीर कार्तीक मेश्राम कलापथकातून म्हणाले, समाजाचा समतोल राखण्यासाठी घटत चाललेला कन्या जन्मदर रोखणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी स्त्री भ्रूण हत्या, बालविवाह लैंगिक भेदभाव, हुंडाबळी या सारख्या समस्यांचा विनाश केला पाहिजेत असे कलापथकातून पोवाळे, नृत्य गीतांची सादरीकरणाद्वारे उपस्थितांना पटवून दिले. कार्यक्रमाला विद्यार्थिनी, महिला बचत गट, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस व गावातील महिला उपस्थित होत्या.