शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनातून रोजगार निर्मितीची गरज

By admin | Updated: March 30, 2015 00:31 IST

सालेकसा तालुक्यात अनेक नैसर्गिक व धार्मिक पर्यटनस्थळ अजूनही उपेक्षीत आहेत.

सालेकसा : सालेकसा तालुक्यात अनेक नैसर्गिक व धार्मिक पर्यटनस्थळ अजूनही उपेक्षीत आहेत. या स्थळाचा विकास साधण्यासाठी योग्य पाऊल उचलले तर तालुक्यातील बेराजगार युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळतील. यासाठी तालुक्यात वातावरण सुद्धा अनुकुल आहे. मात्र यासाठी या क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी केले. सालेकसा येथे आयोजित समाधान योजना शिबिरात उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. तालुका प्रशासनाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय समाधान योजना शिबिराच्या अध्यक्षस्थानी आमगाव क्षेत्राचे आ. संजय पुराम, प्रमुख अतिथी म्हणून जि.प. महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, पं.स. सभापती छाया बल्हारे, सहायक पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे, सहायक उपवनसंरक्षक अश्विन ठक्कर, आमगावचे तहसीलदार राजीव शक्करवार, उपविभागीय अधिकारी दुर्गेश सोनवाने, देवरीचे तहसीलदार संजय नागरिकर, उपजिल्हाधिकारी व सालेकसाचे तहसीलदार सुनिल सूर्यवंशी, जि.प.सदस्य प्रेमलता दमाहे, कल्याणी कटरे, देवकी नागपूरे, पं.स. सदस्या संगीता शहारे, रुपा भुरकूडे, आमगाव खुर्दचे सरपंच योगेश राऊत, बीडीओ व्ही.यू. पचारे, शासकीय कार्यालयाचे अधिकारी, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.स्वर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत विस्तारीत स्वरुपात समाधान शिबिराचे प्रास्ताविक तहसीलदार सुनिल सुर्यवंशी यांनी केले. यावेळी विविध घडामोडीचा आढावा सादर केला. आ. संजय पुराम यांनी शेतकऱ्यांचा समस्येवर विशेष भर देत त्यांच्या विज, पाण्याचा समस्या कायम स्वरुपी दूर करण्यासाठी उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे म्हणाले. सौर उर्जेचा वापर वाढविण्यावर त्यांनी समयोचित मार्गदर्शन केले. याप्रसंगी २० हजाराचे धनादेश व पाच लोकांना रेशन कार्डचे वितरण आ.संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. या समाधान योजना शिबिरात महसूल विभाग, पंचायत, आरोग्य, कृषी, सिंचन, पर्यटन, वन, शिक्षण, संरक्षण, परिवहन इत्यादी विभागाची मुद्देसूद माहिती व योजना प्रदर्शित करणारे तंबू लावण्यात आले होते. काही ठिकाणी प्रात्याक्षिकाद्वारे योजनाची माहिती देण्यात आली.संचालन प्रा. ममता पालेवार, अश्विन खांडेकर यांनी केले. आभार खंडविकास अधिकारी व्ही.यू. पचारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार आर.एम. कुंभरे र.टी. शंकुनदनवार, लांजेवार, एस.एम. नागपूरे यांच्यासह मंडळ अधिकारी तलाठी व सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. ( प्रतिनिधी)