शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्तुपाच्या विकासासाठी सहकार्य गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 22:56 IST

अडीच हजार वर्षापुर्वीचे तीन प्राचीन बौध्द स्तुप पवनी जवळ सापडल्यामुळे ऐतिहासीक प्राचीन पवनी शहर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर येण्याची आता सुरवात होणार आहे. या प्राचीन बौध्द स्तुपांची माहिती येथील नवीन पिढीच्या युवकांना झाली पाहिजे.

ठळक मुद्देप्रशांत सोनवाने यांचे आवाहन : सम्राट अशोक जयंतीनिमित्त कार्यक्रम

आॅनलाईन लोकमतपवनी : अडीच हजार वर्षापुर्वीचे तीन प्राचीन बौध्द स्तुप पवनी जवळ सापडल्यामुळे ऐतिहासीक प्राचीन पवनी शहर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर येण्याची आता सुरवात होणार आहे. या प्राचीन बौध्द स्तुपांची माहिती येथील नवीन पिढीच्या युवकांना झाली पाहिजे. या प्राचीन पवनी शहरात सम्राट अशोक येवून गेल्याची नोंद आहे. येथील प्राचीन स्तुपाचे उत्खनन करुन विकास केल्यास पवनी एक मोठे आंतरराष्ट्रीय स्तराचे केंद्र बनेल. यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन पुरातत्व विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत सोनवाने यांनी केले.डॉ.सोनवाने सम्राट अशोक जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘पवनीचे प्राचीन महत्व’ या विषयावरील पॉवर पार्इंट हाईटेक सादरीकरणात बोलत होते. अध्यक्षस्थानी रायदीघीचे भदंत ज्ञानज्योती, उद्घाटक भदंत संघरत्न मानके तर प्रमुख उपस्थितीत वडसाचे इंजि. डॉ. विजय मेश्राम, अशोक पारधी, डॉ. राजेश नंदुरकर, माजी न्यायाधीश अ‍ॅड. महेंद्र गोस्वामी, लाखांदुरचे प्रा. अनिल कानेकर, प्राचार्य उध्दव रंगारी, सत्यजीव मौर्य उपस्थित होते. डॉ. ज्ञानज्योती यांनी त्रिशरण, पंचशील देवुन मार्गदर्शनात सांगितले की, भारतात व विदेशात बौध्द धर्म वाढविण्याचे काम हजारो वर्षापुर्वी सम्राट अशोका ने केले आहे. त्यामुळे सम्राट अशोकांना कोणत्या करणामुळे राजत्याग करावा लागला याचा विचार करुन जनतेने आज सम्राट अशोकांच्या बुध्दाच्या मार्गावर चालण्याची गरज आहे. भदंत संघरत्न मानके यांनी आपल्या धम्मदेशनेत सांगितले की, सम्राट अशोक व त्यांची कन्या संघमित्रा पवनी ला येवून गेल्याची इतिहासात नोंद असल्यामुळे पवनीला फार महत्व आहे. येथील प्राचीन स्तुपाचा सरकारने विकास करण्याची गरज आहे.अ‍ॅड. महेंद्र गोस्वामी यांनी येथील स्तुपांचा विकास सरकार करत नसेल बौध्द राष्ट्राची मदत घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी डॉ. विजय मेश्राम, अशोक पारधी, डॉ. राजेश नंदुरकर, प्रा. अनिल कानेकर, उध्दव रंगारी यांनी अशोकाच्या जीवनावर प्रकाश टाकला. सत्यजीत मौर्य यांनी अशोकाच्या अनेक पैलुवर मार्गदर्शन केले.याप्रसंगी मान्यवरांना राष्ट्रीय सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मीकांत तागडे, संचालन डॉ. चंद्रशेखर कौशल बांबोळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आनंदविलास रामटेके, रमेश मोटघरे, सुरेखा जनबंधू, अंजीरा भाजीखाये, विनायक ढोक, गुलाम रामटेके, ईश्वर रामटेके, नवनाथ आकरे, भक्तराज गजभिये, गुलाब मेश्राम, विपुल रामटेके, प्रमीला टेंभुर्णे, आनंद वाहणे, रत्नमाला रामटेके, अजय रामटेके आदीनी विशेष सहकार्य केले.