आमगाव (दिघोरी) : समाजाची प्रगती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धम्मामुळे झाली. आत्म्याच्या शुद्धीपेक्षा मनाची शुद्धी करणे गरजेचे आहे. आदर्श समाज निर्माण करण्यासाठी तथागत गौतम बुद्धांच्या विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे राष्ट्रीय सदस्य एम.आर. राऊत यांनी चांदोरी (मालीपार) येथे समता सैनिक दलाच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून केले. कार्यक्रमाचे उद्घाटक गजेंद्र गजभिये तर प्रमुख अतिथी प्रा.वासंती सरदार, प्रविण मेश्राम, आय.जी. बन्सोड, परमानंद बन्सोड, रमेश बन्सोड, अरुण मेश्राम, जनबंधू, देवनाथ बन्सोड, दिनेश रामटेके, महेश निंबार्ते, विजय नंदेश्वर हे होते. सैन्यातून निवृत्त झालेयांनी १९२० मध्ये भीम सेवा दलाची स्थापना केली होती. तेव्हापासून या दलाचे काम सुरु आहे. बाबासाहेबांनी त्याचे नामांतर करून समता सैनिक दल केले. बाबासाहेबांनी केलेल्या चळवळीमध्ये समता सैनिक दलांनी महत्वाची भूमिका बजावली व बजावत असल्याचे प्रतिपादन गजेंद्र गजभिये यांनी केले. यावेळी प्रा.वासंती सरदार यांनी धम्मामध्ये शिलाचे महत्व विशद केले. लोकमित्र प्रतिष्ठानाअंतर्गत समता सैनिक दलाचे सदस्य रंजना बन्सोड, शिला बन्सोड व प्रतिमा बन्सोड यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. भारती व स्नेहा यांनी गीत सादर केले. यावेळी गावामधून समता सैनिक दलाचे पथसंचालन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सरदार गुरुजी तर आभार प्रदर्शन प्रतिमा बन्सोड यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समता सैनिक दलाचे सदस्य व गावकरी उपस्थित होते. वैशाली नगरात कार्यक्रम भंडारा : वैशाली नगर भंडारा येथे बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्ध यांची २५५८ वी जयंती दि भंडारा बी.सी.सी. हाऊसिंग सोसायटीच्या वतीने साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ता अमृत बन्सोड, हर्षल मेश्राम, डॉ.सच्चिदानंद फुलेकर, डॉ.प्रा.अनिल नितनवरे उपस्थित होते. त्यातच प्रत्येकाचे कल्याण आहे. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ता वामनराव मेश्राम होते. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष एम.यू. मेश्राम यांनी तर संचालन संस्थेचे सचिव मन्साराम दहिवले यांनी केले. आभार डॉ.रविंद्र ढोळे यांनी मानले. सकाळी ८.३० वाजता पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व मेणबत्ती, अगरबत्ती प्रज्वलीत करून बौधाचार्य एच.जी. चंद्रिकापुरे यांचे हस्ते बुद्ध वंदना घेण्यात आली. सायंकाळी म्हाडा कॉलनीतून मोठ्या संख्येने कँडल मार्च काढण्यात आले. कार्यक्रमासाठी एम.यू. मेश्राम, सचिन दहिवले, सुरेंद्र सुखदेवे, रविंद्र ढोके, प्रा.मधुकर रुशेश्वरी, दिलीप चंद्रिकापुरे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
आदर्श समाजासाठी बुद्धांच्या विचारांची गरज - राऊत
By admin | Updated: May 17, 2014 23:30 IST