शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

समस्या सोडविण्यासाठी एकनिष्ठ राहण्याची गरज

By admin | Updated: May 1, 2016 00:21 IST

संघटना सर्व जातींच्या कर्मचारी वर्गासाठी अविरत संघर्ष करणारी, न्याय मिळवून देणारी व सर्वांच्याच कल्याणासाठी काम करणारी संघटना आहे.

जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचा उपक्रमसिल्ली : संघटना सर्व जातींच्या कर्मचारी वर्गासाठी अविरत संघर्ष करणारी, न्याय मिळवून देणारी व सर्वांच्याच कल्याणासाठी काम करणारी संघटना आहे. त्यामुळे या महासंघाचे सभासद होऊन कोणत्याही आस्थापनेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी या संघटनेबरोबर एकनिष्ठ राहावे, या महासंघाला अधिक बळकट करावे असा एकच सूर उपस्थित अतिथींनी केला. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाअंतर्गत जिल्हा शाखा भंडाराच्या कार्यालयाचे जि.प. परिसर येथील एका इमारतीमध्ये थाटात उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित अतिथींचा एकच सूर होता.महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे चे केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे यांच्या अध्यक्षतेखाली जि.प. भंडारा येथील सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तुमसर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक राहुल डोंगरे, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब व महासंघ पुणेचे महासचिव प्रभाकर जीवने, उपमहासचिव सूर्यकांत हुमणे, अतिरिक्त महासचिव गजानन थुल, विभागीय अध्यक्ष कविता मडावी, औरंगाबादचे विभागीय अध्यक्ष डॉ.रामटेके, अमरावतीचे विभागीय अध्यक्ष डॉ.तायडे, नागपूरचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ उके, वर्धाचे अध्यक्ष संजय तायडे, चंद्रपूरचे अध्यक्ष तामगायडे, अमरावतीचे अध्यक्ष अशोक बोपडे, सचिव प्रज्ञा जवादे, राठोड, विनेश शैवाळे (संपर्क प्रमुख म.रा.) तसेच भंडारा जिल्हाध्यक्ष विनय सुदामे, उपाध्यक्ष अनमोल देशपांडे, सचिव मनिष वाहाने, अ‍ॅड.विलास कान्हेकर, सापरे, डी.एफ. कोचे, डॉ.मधुकर रंगारी, कुंदा गोडबोले, यशवंत उईके व इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने राहुल डोंगरे, सुधीर वाळके, अरुण गाडे, सूर्यकांत हुमणे आदींनी या महासंघाच्या कार्यप्रणालीवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.शिलवंत मडामे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्ह्याचे उपाध्यक्ष अनमोल देशपांडे यांनी केले. (वार्ताहर)