शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आमदाराच्या घरासमोर लावली कडूलिंबाची झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:12 IST

राष्ट्रीय महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाला २९ वर्षे पूर्ण झालेली आहेत. प्रकल्पाची अनेक कामे अपूर्ण आहेत.

ठळक मुद्देपवनी येथील प्रकार : प्रकल्पग्रस्त पुनर्वसन प्रहार समितीचे अभिनव आंदोलन

आॅनलाईन लोकमतपवनी : राष्ट्रीय महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाला २९ वर्षे पूर्ण झालेली आहेत. प्रकल्पाची अनेक कामे अपूर्ण आहेत. प्रकल्पबाधीत ८५ गावे व १८२ शेतशिवारातील नागरिकांच्या समस्या अद्यापही ‘जैसे थे’ आहेत. लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी आवाज बुलंद करावा या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त पुनर्वसन प्रहार समितीने अभिनव आंदोलन सुरु केले. दुपारी १२ वाजता आमदार रामचंद्र अवसरे यांचे घरासमोर कडुलिंबाचे रोपटे लावले. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाºया राज्य शासनाच्या विरोधात आंदोलकांनी घोषणा दिल्या.प्रकल्पग्रस्तांना आ. रामचंद्र अवसरे यांना भेटून निवेदन द्यायचे होते. परंतु आ.अवसरे भंडारा येथे गेल्याने त्यांचे बंधू सुरेश अवसरे यांनी निवेदन स्वीकारले. भेटण्यासाठी आलेल्या प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त करीत शासनाच्याविरूद्ध नारेबाजी केली. धरणाची मूळ किंमत ३०२ कोटीवरून २० हजार कोटी रूपयांवर पोहचली. शासन वाढलेली किंमत मान्य करते. परंतु १४,९६८ कुटुंबांमध्ये वाढ होऊन ७४,८४० कुटुंबसंख्या झाली ते मान्य करायला शासन तयार नाही. वाढीव कुटुंबासाठी १८ आॅगस्ट २०१५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात १९९० पूर्वी लग्न झाले असावे ही अट टाकली आहे. ती रद्द करावी. प्रकल्पबाधितांना त्यांचा पारंपरिक व्यवसाय व शेती सोडून बाहेर पडावे लागले. शासनाकडून मिळालेली तुटपुंजी मदत व लाभाची रक्कम दैनंदिन खर्चात गेली. आता प्रकल्पग्रस्त दारिद्र्याचा सामना करीत आहेत. प्रत्येक कुटुंबातील किमान एकास नोकरी देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही. नोकरी देता येत नसेल तर २५ लाख रुपये एकमुस्त देण्यात यावे. १८२ शेतशिवार बाधीत गावांचे स्वेच्छा पुनर्वसन करण्यात यावे. पुनर्वसन होईपर्यंत नेरला, सुरबोडी, खापरी, भुटानबोरी, रुयाळ टेकेपार, तिड्डी, निमगाव, कारधा आदी गावातील विद्युत व शासनाच्या सोयीसुविधा सुरू ठेवण्यात यावे, प्रकल्पग्रस्तांना धरणात मासेमारी करू द्यावे, प्रकल्पग्रस्तांचे नाव बीपीएल यादीत समावेश करावे. प्रकल्प ग्रस्तांच्या पाल्यांना उच्चशिक्षण मोफत देण्यात यावे, अशा मागण्या करणारे निवेदन देण्यात आले. यावेळी बाळकृष्ण जुवार, एजाज अली, सोमेश्वर भुरे, रुपेश आथीलकर, युवराज गुरफुडे, मंगेश वंजारी, चेतन पडोळे, स्वप्नील माथुरकर, राजेश पाखमोडे उपस्थित होते.