शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रासेयो शिबिरात सहकार्य आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 22:28 IST

गावाच्या सर्वांगीण विकास व युवकावर श्रम व संस्कार घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला गावाचा सहभाग असावाच.

ठळक मुद्देमाधव जांभुळे : रासेयोच्या विभागीय सोहळ्याचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कखरबी (नाका) : गावाच्या सर्वांगीण विकास व युवकावर श्रम व संस्कार घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला गावाचा सहभाग असावाच. गावाच्या सहभागाशिवाय शिबिर यशस्वी होऊ शकत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना त्रिदिवसीय शिबिराच्या समारोपीय सोहळ्यामध्ये माजी प्रादेशिक संचालक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख माधव जांभुळे व्यासपीठावरून विशेष अतिथी म्हणून बोलत होते.विकास हायस्कूल कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय सेवा योजना त्रिदिवसीय विभागीय शिबिरामध्ये समारोपीय सोहळा आयोजित केला होता.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.श्रीहरी जौंजाळ, विशेष अतिथी नागपूर विभागाचे सहाय्यक संचालक सतीश मेंढे, माजी प्रादेशिक संचालक रा.से.यो. प्रमुख माधव जांभुळे, शिक्षण उपनिरीक्षक जि.प. भंडारा टिचकुले, प्राचार्य वसंतराव कारेमोरे, उद्दल आकरे उपस्थित होते. विशेष अतिथी सतीश मेंढे व्यासपीठावरून बोलताना म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना या शिबिरातून सक्षम युवक घडविण्याकरिता देशाला उपयोगी पडेल असे युवक निर्माण करतो.स्वच्छता व श्रम करण्याकरिता कुठेही कमीपणा मानू नये. नैतिक मुल्य प्रत्येकांनी रूजवावे. समानतेचे बीज रोवले पाहिजे. तेव्हाच आपले जीवन समृद्ध होईल असे मोलाचे मार्गदर्शन केले. माधव जांभुळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर घेताना गावाच्या सहकार्यातून व शासनाच्या अल्प अनुदानातून आयोजन करावे लागले. त्यामुळे शिबिर यशस्वी होतात.रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले व विविध शिबिराचे विविध अनुभव कथन केले. अध्यक्षीय समारोपीय भाषणात डॉ.श्रीहरी जौंजाळ यांनी तुम्ही जा तुम्हाला शुभेच्छा. पण आपले उद्देश काय आहे हे मात्र विसरू नका.समाज घडवा व आदर्श नागरिक बना असा संदेश दिला. त्रिदिवसीय शिबिरादरम्यान राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान या विषयावर समर्थ महाविद्यालय लाखनीचे प्राचार्य संजय पोहरकर यांनी मार्गदर्शन केले.बौद्धिक कार्यक्रमांतर्गत ‘पोरी जरा जपून’ या विषयावर ज्येष्ठ कवियत्री प्रा.विजया मारोतकर यांनी शिबिरार्थिंना मार्गदर्शन केले. योग पतंजली संस्था भंडारा यांच्याद्वारे योगाचे धडे, प्राणायाम व इतर विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विजय गोखले यांनी केले. संचालन विनोद मानकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.चंद्रशेखर गिरडे यांनी केले.