भंडारा : नव्याने केंद्रात आलेल्या सरकारने विविध सेवेत केलेल्या भाववाढीविरुद्ध भंडारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे धरणे दिले. भाजपाने लोकांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रात सत्ता स्थापन केली असली तरी, एका महिन्याच्या कालावधीत घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल, सिमेंट, रेल्वे प्रवास व मालगाडी भाडा वाढ करुन जनतेचे कंबरडे मोडले आहे. या वस्तुंच्या भाववाढीमुळे भाजीपाला व इतर जिवनावश्यक वस्तुंच्या किंमतीसुद्धा गगनाला भिडल्या आहेत. केंद्र सरकार महागाई कमी करण्यात अपयशी ठरली आहे. धानाच्या समर्थन मुल्यात ५०० रुपये वाढ करुन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. याशिवाय बियाणावर दिली जाणारी सुट बंद करुन शेतकऱ्यांच्या समस्यात भर घातली आहे. भाववाढ मागे घेण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकारीमार्फत प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात धानाच्या समर्थन मुल्यात ३००० रु. देण्यात यावे, घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल, सिमेंट, रेल्वे प्रवास, मालगाडी भाडा वाढ त्वरित मागे घेण्यात यावी, बि-बिाणावर दिली जाणारी सबसिडी पूर्ववत सुरू ठेवण्यात यावी या मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात धनंजय दलाल, नरेश डहारे, जयंत वैरागडे, रुबी चढ्ढा, बाबु बागडे, हाजी सलाम, अरविंद पडोळे, नरेंद्र झंझाड, योगेश हेडाऊ, बाबा पठाण, विनय पशिने, किरण कुंभरे, धनराज साठवणे, ईश्वर कळंबे, चंद्रशेखर रामटेके, सुखराम देशमुख, हरिचंद इळपाते, उत्तम कळपते, सुखराम चोपकर, सोमेश्वर राघोर्ते, प्रभु चौधरी, अरुण अंबादे, रामेश्वर चांदेकर, स्वप्नील नशिने, फजल पटेल, ज्योती टेंभूर्णे मीना कुरंजेकर, सारीका साठवणे, मीरा मोहनकर, सुनीता चोपकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे
By admin | Updated: July 6, 2014 23:47 IST