शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

नवोदय विद्यालय अन्यत्र हलविल्यास आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 21:56 IST

१७ वर्षानंतर भंडारा येथे केंद्र सरकार मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नवोदय विद्यालय प्राप्त झाले. सध्यस्थितीत विद्यालय जिल्हा परिषदेच्या जुन्या जकातदार कन्या शाळेत आहे. परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या पत्रानुसार सदर इमारत मोडकळीस असल्याचे कळविले.

ठळक मुद्देप्रवीण उदापुरे : पत्रकार परिषदेत पालकांनी मांडल्या व्यथा
<p>लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : १७ वर्षानंतर भंडारा येथे केंद्र सरकार मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नवोदय विद्यालय प्राप्त झाले. सध्यस्थितीत विद्यालय जिल्हा परिषदेच्या जुन्या जकातदार कन्या शाळेत आहे. परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या पत्रानुसार सदर इमारत मोडकळीस असल्याचे कळविले. कोणत्याही क्षणी इमारत ध्वस्त होऊन विद्यार्थ्यांच्या जीविताला हानी पोहचू शकते. तथापि ५ आॅगस्टपर्यंत जिल्हाधिकारी यांनी पर्यायी व्यवस्था उभारून न दिल्यास आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल, असा सज्जड इशारा नागपूर विद्यापीठ सीनेट सदस्य प्रवीण उदापुरे व पालकांनी दिला आहे.ते म्हणाले, जिल्हाधिकारी स्वत: नवोदय विद्यालय समितीचे अध्यक्ष असून मुख्य पालक आहे. परंतु आजपर्यंत एकदाही त्यांनी विद्यालयाला भेट दिली नाही. त्यामुळे त्यांचा निषेध करण्यात आला. विशेष म्हणजे सदर प्रकरणाला घेऊन पालकवर्ग शासन दरबारी मागील तीन महिन्यांपासून येरझारा मारत आहेत. प्रत्येक वेळी निव्वळ आश्वासने देण्यात येत आहेत. नवोदय विद्यालयासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण न करता संपूर्ण विद्यार्थी जिल्ह्याबाहेर नवेगावबांध तसेच वर्धा, नागपूर, बालाघाट जिल्ह्यात हलविण्याच्या प्रयत्नात आहेत.पाचगाव येथे नवीन नवोदय विद्यालय निर्मितीचा प्रस्ताव अजूनपर्यंत थंडबस्त्यात आहे. भंडारा जिल्ह्याचे विभाजन झाल्याने भंडारा जिल्ह्यात नवीन नवोदय येण्यास तब्बल १८ वर्षांचा उशिर झाला. परंतु हाती आलेला नवोदय विद्यालय प्रशासन पुन्हा रद्द करून बाहेरच्या जिल्ह्यात पळविण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात येईल, असा इशारा नागपूर विद्यापीठ सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी दिला आहे. नवोदय विद्यालयासाठी नवीन पर्यायी व्यवस्था ५ आॅगस्ट पर्यंत निर्मान न केल्यास ६ आॅगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच ९ आॅगस्ट पासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. तत्पूर्वी नवोदय विद्यालयातील संपूर्ण विद्यार्थी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात आणून सोडणार असल्याचे सांगितले.पत्रपरिषदेला नागपूर विद्यापीठ सीनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांचेसह विद्यार्थ्यांचे पालक नरेंद्र कातोरे, विलास मोथरकर, शशीकांत गजभिये, प्रमोद नागदेवे, गणेश चेटुले, महेंद्र कठाणे, लक्ष्मण निंबार्ते, भगवान ढेंगे, विनोद बांगर आदी उपस्थित होते.