शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

विषबाधा झालेल्या रोहणीच्या भाविकांची प्रकृती धोक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST

लाखांदूर तालुक्यातील रोहणी येथील गुरूदेव सेवा मंडळाच्यावतीने भागवत सप्ताह आणि ग्रामगीता वाचन कार्यक्रमाचे आयोजन ३१ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत केले होते. केशव महाराज भोंडे यांनी भागवत कथेचे वाचन केले. रविवारी समारोपीय कार्यक्रम आयोजित होता. काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कुडेगाव, रोहणी, गवराळा, किरमटी, दोनाडा आदी गावातील भाविकांनी महाप्रसाद ग्रहन केला.

ठळक मुद्देमहाप्रसादातून विषबाधा : परिणय फुकेंसह आरोग्य उपसंचालकांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : भागवत सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमातून रोहणी येथे विषबाधा झालेल्या सर्व ३०० ही भाविकांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. सध्या कुडेगाव आणि लाखांदूर येथील रुग्णालयात विषबाधितांवर उपचार सुरू असून आमदार डॉ. परिणय फुके, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे आणि आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांनी लाखांदूरला भेट देऊन विषबाधितांवर योग्य उपचार करण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले आहे.लाखांदूर तालुक्यातील रोहणी येथील गुरूदेव सेवा मंडळाच्यावतीने भागवत सप्ताह आणि ग्रामगीता वाचन कार्यक्रमाचे आयोजन ३१ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत केले होते. केशव महाराज भोंडे यांनी भागवत कथेचे वाचन केले. रविवारी समारोपीय कार्यक्रम आयोजित होता. काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कुडेगाव, रोहणी, गवराळा, किरमटी, दोनाडा आदी गावातील भाविकांनी महाप्रसाद ग्रहन केला.रात्री ८ वाजेपर्यंत परिसरातील शेकडो भाविकांनी महाप्रसाद घेतला. दरम्यान सोमवारी पहाटेपासून काही जणांना पोटदुखी, हगवण, उलटीचा त्रास सुरू झाला. त्यांना कुडेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु एकापाठोपाठ एक अनेक रुग्ण येवू लागले. अनेक रुग्णांना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. तर रोहणी येथेही आरोग्य शिबिर सुरू करण्यात आले.सध्या सर्व विषबाधीत भाविकांची प्रकृती धोकादायक असून अनेकांना सुट्टी देण्यात आली आहे. तर लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात ६२, कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात २२ आणि रोहणी येथील ग्रामपंचायत सभागृहात लावलेल्या शिबिरात २० जणांवर उपचार सुरू आहे. लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात डॉ. सुनील रंगारी, डॉ. राहूल बोरकर, डॉ. महेश नाकाडे, डॉ. अनुजा भुसारी, डॉ. संदीप तिडके, डॉ. श्रीराम राजुरे, डॉ. मेश्राम रुग्णांवर उपचार करीत आहेत. सहायक अधीक्षक प्रवीण नगरारे, रमेश धुर्वे, जयश्री बन्सोड, कर्मचारी नाना भेंडारकर, पंकज दखने, दिनेश तोमसकर आदी मदत करीत आहेत.या घटनेची माहिती होताच आमदार डॉ. परिणय फुके यांनी थेट लाखांदूरचे ग्रामीण रुग्णालय गाठले. तेथे रुग्णांची विचारपूस केली. तसेच उपस्थित आरोग्य यंत्रणेला योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले. यासोबतच त्यांनी कुडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रोहणी येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची भेट घेतली. आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांनीही लाखांदूर येथे भेट दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते आणि जिल्हाधिकाऱ्यांचे पथक लाखांदूर येथे तळ ठोकून आहे. रुग्णालयाला जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य प्रणाली ठाकरे, नगराध्यक्ष भारती दिवठे, तहसीलदार संतोष महल्ले, डॉ. निखिल डोकरीमारे यांनी भेटी दिल्या.विधानसभा अध्यक्षांचे निर्देशविषबाधेच्या घटनेची माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले. त्यांनी तात्काळ आरोग्य प्रशासनाला निर्देश देत तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्येक रुग्णावर योग्य उपचार करण्यासही सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल