शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

निसर्गाने झोडपले, किडींनी संपविले धानपिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 23:40 IST

अड्याळ आणि परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी आज चिंताग्रस्त स्थितीत आहेत. दवर्षी एका पाण्याने जाणारे शेतपिक शनिवारला झालेल्या एका पाण्यानेच गेल्याचे सांगण्यात येते.

ठळक मुद्देउभ्या पिकाला लागलेली अगणित किड यामुळे येथील बळीराजा पुन्हा 'घायाळ' झालेला दिसतो.

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ आणि परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी आज चिंताग्रस्त स्थितीत आहेत. दवर्षी एका पाण्याने जाणारे शेतपिक शनिवारला झालेल्या एका पाण्यानेच गेल्याचे सांगण्यात येते. त्यात पुन्हा भर म्हणजे उभ्या पिकाला लागलेली अगणित किड यामुळे येथील बळीराजा पुन्हा 'घायाळ' झालेला दिसतो. जखमेवर मिठ चोळण्याचे काम निसर्गाने केले आहे. सगळीकडे शेतकरी हाहाकार करीत असतानाही मात्र कुठलेही अधिकारी किंवा कर्मचारी पिक पाहणीला आले नाही. त्यामुळे शेतकºयांत कृषी विभागाविरोधात असंतोष व्यक्त केला जात आहे.अड्याळ आणि परिसरातील शेतकºयांच्या शेतात कशा पद्धतीचे पीक आहे हे तरी अधिकाºयांना माहित राहणार तरी कसे. कारण सुट बुटातील एसी गाडीतील आधिकाºयांना फार कमी शेतकरी ओळखतात. शेतातील पीक कापण्यापेक्षा जाळलेला बरा असेही शेतकरी म्हणतात. शेतातील सोनपिकाची राखरांगोळी जर होत असेल तर काय करावे त्या शेतकºयांनी, शेतातील शेतपिकाचा अड्याळ व परिसरातल शेकडो ग्रामस्थांनी पिकविमा काढला. त्याचा आता उपयोग होणार नसेल तर काय उपयोग त्या पिकविम्याचा.यावर्षी अड्याळ व परिसरातील शेतकरी वेगवेगळ्या कारणांनी संकटात आले. त्यात एका पाण्याची कमतरता, रोगाची लागण, निसर्गाची अवकृपा अणि किडनाशक औषधी फवारणीला रक्कमेची कमतरता अशा एक ना अनेक कारणांनी येथील शेतकरी हवालदिल झाला आहे, मात्र शासन- प्रशासनाला जाग येत नाही म्हणजे काय, शेतकºयाच्या हिताच्या बाता सांगणारे, लढा देणारे, मोर्चे काढणारे, स्वत:ला शेतकºयाचे हितचिंतक म्हणवणारे नेते, कार्यकर्ते मंडळी आता आहेत तरी कुठे?अड्याळ व परिसरातील शेतकरी दरवर्षी पिकविमा काढतात. आता उभ्या सोन्यासारख्या पिकाची दुर्दशा झाली आहे. पिकविमा घेणारे मात्र गप्प आहेत, मग त्या शेतकºयांनी करायचे तरी काय, पिकविमा काढला तरी एखादीवेळीच कवडीमोल मोबदला मिळतो. त्यानंतर शेतकºयांना पिकविमा रक्कम भरायची सक्ती कशाला, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अड्याळ मधून यावर्षी अड्याळ आणि सालेवाडा येथील अंदाजे ६५० शेतकºयांकडून पिकविमा घेण्यात आला आणि यापैकी अंदाजे ८० टक्के शेतकºयांचे धानाची फसल विविध कारणांनी गेल्याची ओरड गावात आहे. पिकविमा काढला तर आता त्या पिकविम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे की नाही, असा सवाल येथील शेतकरी करताना दिसत आहे.गावातील शेतकºयांकडून प्रति एकर ३०० ते ३५० रूपये कर्ज घेणाºया प्रत्येकाला पिकविमा म्हणून रक्कम घेतली. कर्ज पाहिजे तर मग पिकविमा काढावाच लागेल आणि कर्ज घेणाºया प्रत्येक शेतकºयांनी तो काढला सुद्धा. आता वेळ आली आहे पिकविमा घेण्याची, परंतु पिकविमा मिळणार तरी कसा, शेतकरी सध्या एवढा हतबल आहे की दिवाळी विसरली आणि त्यात विरजन म्हणजे कोणाचीही साथ नाही, अशास्थितीत करायचे तरी काय?शासन, प्रशासन संबंधित विभागाने आतापर्यंत पाहणी न करण्याचे कारण म्हणजे काय असणार, तापल्या तव्यावर पोळी शेकायला हजारो येथे म्हणतात, पण शेतकºयांचे दुर्देव असे की जेव्हा शेतकºयांवर वेळ येते तेव्हा भलतेच चित्र समोर येते. आतातरी जास्त वेळ घालवण्यापेक्षा अड्याळ व परिसरातील पिकांची पाहणी होणे गरजेचे आहे. नुसती पाहणी करूनही उपयोग नाही तर संबंधित शेतकºयांना पिकविम्याचा लाभ मिळावा, अशीही मागणी येथील शेतकºयांकडून होताना दिसत आहे. याविषयी गंभीर आणि खंबीर कोण भूमिका घेणार, याकडे आता अडयाळ व परिसरातील शेतकºयांचे लक्ष लागले आहे.