शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग चक्रात खोळंबली रोवणी

By admin | Updated: July 28, 2016 00:31 IST

तालुक्यात यावर्षी पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने रोवणी खोळंबली आहे. वेळ निघून गेल्याने एकूण उत्पादनात मोठी घट येणार असल्याने बळीराजा चिंताग्रस्त दिसत आहे.

बळीराजा चिंताग्रस्त : लाखांदूर तालुक्यात पावसाची हुलकावणी, वलमाझरी तलाव तुडूंब भरल्याने जलमयस्थितीलाखांदूर : तालुक्यात यावर्षी पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने रोवणी खोळंबली आहे. वेळ निघून गेल्याने एकूण उत्पादनात मोठी घट येणार असल्याने बळीराजा चिंताग्रस्त दिसत आहे. दरवर्षी जुलै महिन्याच्या शेवट शंभर टक्के रोवणी आटोपतात. मात्र यंदा दमदार पावसाने हजेरी न लावल्याने व पऱ्ह्याची वाढ मर्यादा संपल्याने उशिरा रोवणी झाल्यास एकूण उत्पादनात मोठी घट येऊन नुकसानीचा सामना करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन पडली आहे. मागील पाच वर्षांची पावसाची टक्केवारी बघीतली असता मोठी तफावत दिसून येते. २५ जुलै २०११ पर्यत एकूण ६८३.५ मि.मी. २५ जुलै २०१२ पर्यंत एकूण ३७८.९ मि.मी., २५ जुलै २०१३ पर्यंत एकूण ११६२.९ मि.मी., २५ जुलै २०१४ पर्यंत एकूण ३५२.६ मि.मी., २५ जुलै २०१६ पर्यंत एकूण ३८२ मि.मी. पावसाची नोंद आहे. शेतकऱ्यांसाठी हा चिंतेचा विषय ठरला आहे. या वर्षी १० जुलै ला केवळ सर्वाधिक ९० मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली.पऱ्हे घातल्यानंतर २० ते २५ दिवसाचे आत रोवणी आटोपली पाहिजे. परंतु तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने रोवणी खोळंबली आहे. महागडे बियाणे घेऊन शेती होऊ शकली नसल्याने दुष्काळाचे सावट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास खरीप हंगाम कोरडा जाणार असल्याची भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे. रोवणी न झाल्याने कृषी केंद्र औषधी व खत विक्री बंद पडल्याने ओस पडली आहेत. (तालुका प्रतिनिधी)साकोली : वलमाझरी तलाव पाण्याने तुडूंब भरलेला असतानासुद्धा पाण्याअभावी वलमाझरी, पिंडकेपार परिसरातील रोवणी रखडलेली आहेत. वलमाझरी परिसरातील जमिन मुरमाड असल्यामुळे तलावातील पाण्याशिवाय रोवणी होत नाही, हा दरवर्षीचा रेकॉर्ड आहे. दरवर्षी तलावातील पाणी सोडूनच या परिसरातील रोवणी केली जातात. यावर्षी सुरूवातीलच्या पावसानेच तलाव तुडूंब भरलेला आहे. परंतु पाणी वाटपाची जबाबदारी असलेल्या ल.पा.च्या अधिकाऱ्यांची अनास्था शेतकऱ्यांसाठी मारक ठरू पाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी करूनसुद्धा तलावातील पाणी सोडण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांनी याबात लघु सिंचाई विभागाला लेखी निवेदन दिले, अधिकाऱ्यांशी संपर्क साधला परंतु त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. वेळेवर रोवणी न झाल्यास त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. रोवणी वेळेत होत नसल्याने या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे नेहमी सरकारच्या वतीने सांगितले जाते. परंतु येथील निगरगट्ट अधिकारी शेतकऱ्यांची कैफियत एैकायला तयार नाही. मग शेतकऱ्यांनी दाद मागायची तरी कुणाकडे, असा बिकट प्रसंग आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. तलावातील पाणी लवकर सोडून परिसरातील शेतकऱ्यांची खोळंबलेल्या रोवणीची समस्या दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे, असे न झाल्यास शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे (शहर प्रतिनिधी)