शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

नैसर्गिक टेकड्या उद्ध्वस्त, मुरूम तस्करांचा धुमाकूळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 12:48 IST

गडकुंभली परिसरातील प्रकार : मुरूम उत्खननाची परवानगी नाही

लोकमत न्यूज नेटवर्क साकोली : तालुक्यात रेती चोरीसोबतच मुरूम चोरीचे प्रमाण वाढले आहे. गडकुंडली व परिसरात नैसर्गिक टेकड्या उद्ध्वस्त करून दररोज मुरूम या गौण खनिजाची चोरी सुरू आहे. रोज येथून ६० ते ७० ट्रॅक्टर मुरूमाचे उत्खनन सुरू आहे. यामुळे नैसर्गिक टेकड्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मुरूम तस्करांच्या मुसक्या आवळल्या नाहीत तर नैसर्गिक टेकड्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. महसूल प्रशासनाने येथे कडक कारवाई करण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

साकोली गडकुंडली या केवळ हाकेच्या अंतरावर गडकुंडली हे गाव आहे. या गावाच्या परिसरात पहाडी रस्त्याशेजारी गौण खनिज मुरूम मोठ्या प्रमाणात आहे. येथे मोठ्या टेकड्या असून, त्यात मुरूमाचा मोठा साठा आहे. परिसरातील जमिनीतही मुरूम मोठ्या प्रमाणात आढळतो. 

साकोली तालुक्यात नैसर्गिक टेकड्या आहेत. त्या टेकड्या मुरूम तस्करांनी अक्षरशः उद्ध्वस्त केल्या आहेत. यापूर्वी या टेकड्यांमधून रस्त्याच्या बांधकामाकरिता रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात मुरूम घालण्यात आला होता. महसूल प्रशासनाकडून यासाठी रितसर परवानगी घेतल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. परंतु, अतिशय कमी ब्रासची परवानगी येथे घेण्यात आली होती. रस्त्याच्या कामावर तसेच घर बांधकामातील भरावात मरूमाचा वापर केला जातो. शहरात या मुरूमाला मोठी मागणी आहे. त्या संधीचा फायदा घेत परिसरातील मुरूम तस्कर सक्रिय झाले आहेत. 

मुरूमाची चोरी सुरूच दररोज ६० ते ७० ट्रॅक्टर मुरूमाचे या परिसरातून उत्खनन केले जात आहे. मुरूमाची रस्त्याच्या कामावर तसेच शहरात विक्री केली जाते. शहरातून मुरूमाचे ट्रॅक्टर भरधाव वेगाने धावतात. त्यावर मोठी कारवाई अजूनपर्यंत झालेली नाही. त्यामुळे मुरूम तस्करांचे फावत आहे. मुरूम तस्करी करणारे याच परिसरातील आहेत. मुरूम तस्करी करणाऱ्यांचे येथे मोठे रॅकेट असून, रेती तस्करांसारखीच त्यांची टोळी येथे बऱ्याच महिन्यांपासून सक्रिय आहे.

रॉयल्टी ५० ट्रिपची, उत्खनन २०० ट्रिपसाकोली तहसील कार्यालयातून मुरूम ठेकेदार ५० ट्रिपची रॉयल्टी घेतात व त्याऐवजी २०० ते २५० ट्रिप मुरूमाचे उत्खनन करतात. तलाठी व तहसीलदार यांना मॅनेज करून हे प्रकार सुरू असतात. याची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडारा